पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय संघाच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीबाबत मोठं विधान केलं आहे. विराट कोहलीने भारतीय टी-२० संघाचे संघाने कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्याबाबत विचार करायला हवा, असं मत शोएब अख्तरने व्यक्त केलं आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्स संघाने नुकतंच आयपीएलचं पाचवं जेतेपद आपल्या नावावर केलं. मुंबई इंडियन्सच्या या ऐतिहासिक विजयानंतर सध्याच्या भारतीय संघाच्या नेतृत्वाच्या विभाजनाची चर्चा सुरु झाली.
'ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही रोहित शर्माची अतिशय महत्वाची असेल, या मालिकेत चांगली कामगिरी करुन भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी रोहितला स्वत:ला सिद्ध करता येईल. कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा अतिशय उत्तमरित्या भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो', असं शोएब अख्तर म्हणाला.