नागपूर : पहिल्या कसोटीत पावसाने खोडा घातल्यानंतर विराटसेना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विजयाचे खाते उघडण्यास उत्सुक आहे. व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये शुक्रवारपासून प्रारंभ होणाºया दुसºया कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयाच्या निर्धाराने उतरणार आहे.कोलकाता कसोटीत अखेरच्या सत्रामध्ये श्रीलंकेवर वर्चस्व गाजवल्यामुळे भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. पुढील महिन्यात होणाºया द. आफ्रिका दौºयाच्या पार्श्वभूमीवर भारताने या मालिकेसाठी हिरवळ असलेल्या खेळपट्ट्या तयार केल्या आहे. ईडनवर हिरवळ असलेल्या खेळपट्टीनंतर जामठा येथेही हिरवळ असलेलीच खेळपट्टी आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांची भूमिका महत्त्वाची ठरण्याचे संकेत मिळत आहेत, पण पहिला चेंडू पडेपर्यंत कुठलेही भाकीत वर्तवणे घाईचे ठरेल. ईडनच्या तुलनेत येथे हिरवळ कमी असल्यामुळे फलंदाजांना अधिक अडचण जाणार नाही. कोहलीने ईडनच्या खेळपट्टीवर शतकी खेळी करीत जगात सर्वोत्तम फलंदाजांमध्ये का गणना होते, हे सिद्ध केले आहे. कोहलीकडून उर्वरित भारतीय फलंदाज प्रेरणा घेतील, अशी आशा आहे.शिखर धवनने वैयक्तिक कारणास्तव ब्रेक घेतल्यामुळे मुरली विजय अंतिम अकरामध्ये परतणार असल्याचे निश्चित आहे. त्याचप्रमाणे भुवनेश्वरच्या अनुपस्थितीत ईशांत शर्माचे संघातील पुनरागमन निश्चित आहे. ईशांत सध्याच्या संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू असून, तो ७७ कसोटी सामने खेळला आहे. कोलकाता कसोटीत फलंदाजी व गोलंदाजीमध्ये अपयशी ठरलेल्या रवींद्र जडेजाच्या स्थानी कुलदीपला संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे. के. एल. राहुल, पुजारा यांच्याकडून चमकदार कामगिरीची अपेक्षा असून, पहिल्या कसोटीत अपयशी ठरलेल्या रहाणेला सूर गवसेल, अशी आशा आहे.दुसºया बाजूचा विचार करता पहिल्या कसोटीत सुरुवातीला वर्चस्व गाजवणाºया लंकेला अखेर मात्र संघर्ष करावा लागला होता. श्रीलंका संघ यापासून बोध घेत दुसºया कसोटीत छाप सोडण्यास उत्सुक आहे. श्रीलंकेने ३ वेगवान गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला तर पहिल्या कसोटीत सुमार कामगिरी करणाºया लाहिरूला वगळण्याची शक्यता असून पर्याय म्हणून विश्वा फर्नांडोला संधी मिळू शकते. फिरकी गोलंदाजीमध्ये चायनामनलक्षण संदाकनचा पर्यायही त्यांच्याकडे उपलब्ध आहे.>होय...ही द. आफ्रिका दौºयाची तयारीचएकापाठोपाठ एक मालिका जिंंकल्या म्हणजे कर्णधारासह खेळाडूंमध्येही नवा आत्मविश्वास संचारतो. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीही त्याला अपवाद नाही. शुक्रवारपासून श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाºया दुसºया कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना कोहलीच्या देहबोलीवरून ते स्पष्ट दिसत होते. दक्षिण आफ्रिका दौºयाच्या तयारीसाठी फार वेळ मिळणार नसल्यामुळे, संघ व्यवस्थापनाकडे श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेसाठी हिरवळ असलेल्या व उसळी घेणाºया खेळपट्ट्या तयार करण्याची विनंती केली, अशी स्पष्ट कबुली विराटने आज दिली.>ईडनच्या तुलनेत कमी हिरवळ : चांदीमलईडन गार्डनच्या तुलनेत जामठ्याच्या खेळपट्टीवर हिरवळ कमी असून, अनुभवी फिरकीपटू रंगना हेराथ दुसºया कसोटी सामन्यात अधिक उपयुक्त ठरेल, असा विश्वास श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चांदीमलने व्यक्त केला. दुसºया कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला चांदीमल पत्रकार परिषदेत बोलत होता. पहिल्या कसोटी सामन्यात हेराथने दोन डावांत केवळ आठ षटके गोलंदाजी केली. याबाबत विचारले असता चांदीमल म्हणाला, ‘रंगना अनुभवी असून, या खेळपट्टीवर तो उपयुक्त ठरेल.>जामठा स्टेडियम भारतासाठी ‘लकी’श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणारा दुसरा कसोटी सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या इतिहासातील ५० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. जामठा स्टेडियममध्ये यजमान संघ सहावा कसोटी सामना खेळणार आहे. आतापर्यंत भारतीय संघाने ३ विजय (एक अनिर्णीत व एक पराभव) मिळवताना या मैदानावर वर्चस्व गाजवले आहे.>प्रतिस्पर्धी संघभारत : विराट कोहली (कर्णधार), के. एल. राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा, आर. आश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, ईशांत शर्मा, विजय शंकर, कुलदीप यादव, रोहित शर्मा.श्रीलंका : दिनेश चांदीमल (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, करुणारत्ने, निरोशन डिकवेला, धनंजय डिसिल्वा, सुरंगा लकमल, दासुन शनाका, विश्वा फर्नांडो, लाहिरू गामेगे, लक्षण संदाकन, सदीरा समरविक्रमा, दिलरुवान परेरा आणि रोशन सिल्वा.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ‘विराट’सेना विजयासाठी आतुर, श्रीलंकेविरुद्ध वर्चस्व गाजवण्याचा निर्धार
‘विराट’सेना विजयासाठी आतुर, श्रीलंकेविरुद्ध वर्चस्व गाजवण्याचा निर्धार
नागपूर : पहिल्या कसोटीत पावसाने खोडा घातल्यानंतर विराटसेना श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत विजयाचे खाते उघडण्यास उत्सुक आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 3:41 AM