Virat Kohli Secrets IPL 2023: विराट कोहली… एक असा फलंदाज ज्याची प्रतिभा जगाने मान्य केली आहे. जर हा खेळाडू क्रीजवर आला तर प्रत्येक गोलंदाजाचे धाबे दणाणल्याशिवाय राहत नाही. विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये आपल्या बॅटिंगची प्रतिभा दाखवत आहे. यामुळेच RCB ने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आता RCB चा पुढचा सामना दिल्लीतदिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स हे त्यांच्या होमग्राऊंडवर खेळणार असले तरी दिल्ली हे विराटचे देखील घर आहे. त्यामुळे आज विराटची फलंदाजी पाहायला नक्कीच मजा येईल. याच दरम्यान दिल्ली विरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीबाबत एक मजेशीर खुलासा झाला आहे. विराट कोहलीसोबत क्रिकेट खेळणाऱ्या त्याच्या मित्राने एका व्हिडिओमध्ये सांगितले की विराट कोहली कसा दूधवाल्याच्या सायकलमुळे कायम 'नंबर वन' यायचा.
विराट कोहली मस्तीखोर होता...
विराट कोहलीच्या मित्राने आरसीबीच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये खुलासा केला की प्रशिक्षक राजकुमार शर्मा अनेकदा खेळाडूंना धावायला लावायचे. ते खेळाडूंना अकादमी बाहेरच्या रस्त्यावर धावायला सांगायचे. 5 किमी धावण्याचे सर्किट होते. सर्किट खूपच लांब होते त्यामुळे सगळेच दिसत नसत. विराट कोहलीच्या मित्राने सांगितले की, त्यावेळी विराट धावताना थोडा मागे राहायचा आणि पण सायकलवरून दूध घेऊन जाणाऱ्या लोकांकडून लिफ्ट घेऊन तो पुढे पोहोचायचा. असे अनेकदा व्हायचे आणि कोच मात्र विराटला पुढे गेलेला पाहून आनंदी व्हायचे.
जेव्हा चेंडू विराट कोहलीच्या छातीवर लागला...
विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनीही या व्हिडिओमध्ये अनेक रंजक गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितले की, विराट कोहली जेव्हा पहिल्यांदा क्रिकेट अकादमीमध्ये आला तेव्हा तो त्याच्या वयाच्या मुलांसोबत कधीच बाहेर पडला नव्हता. यानंतर त्याने प्रशिक्षकाला सांगितले की, मला मोठ्या क्रिकेटपटूंसोबत खेळायचे आहे. प्रशिक्षकानेही त्याला एके दिवशी खेळण्याची संधी दिली आणि त्याने चांगली फलंदाजी केली. फलंदाजी करताना एक चेंडू त्याच्या छातीला लागला तरी. त्याने हे कोणालाही सांगितले नाही, परंतु जेव्हा त्याच्या आईने घरी हे पाहिले तेव्हा तिने प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांना सांगितले की विराट कोहलीला त्याच्या वयाच्या मुलांसह खेळू द्या.
Web Title: Virat was always number 1 because of milkman bicycle read An amazing story told by childhood friend
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.