Join us  

IND vs AUS: "रोहितपेक्षा विराटच बरा होता", हिटमॅनच्या कॅप्टनसीवरून नेटकऱ्यांनी साधला निशाणा

सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 1:02 PM

Open in App

नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलिया आणि भारत (IND vs AUS) यांच्यामध्ये टी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात कांगारूच्या संघाने विजय मिळवून विजयी सलामी दिली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या खराब परिस्थितीचा सामना करत आहे. आशिया चषकात आलेल्या अपयशामुळे हिटमॅन रोहितला अनेक टीकाकारांचा सामना करावा लागला होता. काल झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 208 धावांची विशाल धावसंख्या उभारून देखील संघाला पराभव पत्करावा लागला. भारतीय गोलंदाजांचा धावांचा बचाव करता न आल्याने त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजी करून 20 षटकांत 208 एवढ्या धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने 19.2 षटकांत 6 बाद 211 धावा करून शानदार विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या नवव्या षटकात लोकेश राहुलकडून स्मिथचा (18) झेल सुटला. आंतरराष्ट्रीय टी-20 त प्रथमच सलामीला आलेल्या कॅमेरून ग्रीनने 26 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. मात्र चर्चा रंगली ती कर्णधार रोहित शर्माने केलेल्या एका कृत्याची ज्यावरून त्याला खूप ट्रोल केले जात आहे. मॅक्सवेलचा झेल घेण्यासाठी कार्तिकने चेंडू खूप खाली येण्याची वाट पाहिली. त्यामुळे तिसऱ्या अम्पायरलाही तो झेल पात्र आहे का ते पाहावे लागले. त्यामुळे रोहित थोडा नाराज दिसला आणि तो कार्तिकला बडबडला. अर्थात हे सर्व खेळीमेळीतच घडत होते. मात्र नेटकऱ्यांना या घटनेचा संदर्भ आशिया चषकातील काही कृत्यांशी जोडून रोहितवर निशाणा साधला आहे. सध्या नेटकरी #captaincy  हा हॅशटॅग वापरून रोहितच्या कर्णधारपदाची खिल्ली उडवत आहेत. 

नेटकऱ्यांनी रोहितच्या कर्णधारपदाची उडवली खिल्ली 

हार्दिक पांड्याची वादळी खेळी नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीला आला. रोहित (11) आणि विराट (2) धावांवर माघारी परतले. 2 बाद 35 वरून लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव यांनी भारताला डाव सावरला. लोकेश व सूर्यकुमार यादव यांची 42 चेंडूंवरील 68 धावांची भागीदारी केली. लोकेश 35 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 55 धावांवर माघारी परतला. सूर्याने 25 चेंडूंत 2 चौकार व 4 षटकारांसह 46 धावा केल्या. अक्षर पटेल (6) व दिनेश कार्तिक (6) कालच्या सामन्यात उल्लेखणीय कामगिरी करू शकले नाहीत. हार्दिक पांड्याचे वादळ नंतर घोंगावले. त्याने 20व्या षटकात सलग तीन षटकार खेचले आणि 30 चेंडूंत 7 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 71 धावा केल्या. भारताने 6 बाद 208 धावांचा टप्पा गाठला. 

विराटचे केले समर्थन 

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह. 

ऑस्ट्रेलियाविरुद्धचे वेळापत्रक  २० सप्टेंबर मोहाली २३ सप्टेंबर - नागपूर २५ सप्टेंबर- हैदराबाद  

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघमिम्स
Open in App