India vs England Test Series ( Marathi News ) : विराट कोहलीचा ( Virat Kohli) विषय आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, संघ व्यवस्थापन यांच्यासाठी डोकेदुखी बनताना दिसतोय. विराटने वैयक्तिक कारण सांगून इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत निवड झालेली असताना माघार घेतली. त्याच्या निर्णयाचा आदर राखून BCCI ने एक निवेदन जाहीर केले आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबदल काही उलटसुलट चर्चा करू नका अशी विनंती सर्वांना केली. पहिल्या दोन कसोटी झाल्यानंतर तिसऱ्या कसोटीतून तू पुनरागमन करेल असे वाटले होते, परंतु आता हाती आलेल्या वृत्तानुसार तो तिसऱ्या व चौथ्या कसोटीतही खेळणार नाही आणि कदाचित पाचव्या कसोटीलाही मुकण्याची शक्यता आहे.
अनुष्काची प्रेग्नेन्सी, आईचं आजारपणं अशा वेगवेगळ्या चर्चा विराटच्या माघारीमागे रंगल्या आहेत. पण, अद्याप त्याने माघार का घेतली हे स्पष्ट झालेले नाही. दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर जेव्हा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना विराटबाबत विचारले गेले, तेव्हा त्यांनी हा प्रश्न निवड समितीला विचारा असे म्हटले होते. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील विराटची अनुपस्थिती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताचा सीनियर फंलंदाज अनुक्रमे राजकोट आणि रांची येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीला मुकण्याची शक्यता बळावली आहे. क्रिकइन्फोला मिळालेल्या माहितीनुसार ६ मार्चपासून सुरू होणाऱ्या धर्मशाला येथील पाचव्या कसोटीसाठी कोहलीच्या उपलब्धतेबाबतची शंका कायम आहे.
विराटच्या या अनुपस्थितीबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्याने अद्याप तिसऱ्या कसोटीसाठी त्याच्या उपलब्धतेबाबत कळवलेले नाही. १५ फेब्रुवारीपासून राजकोट कसोटी सुरू होतेय आणि निवड समिती आज बैठक घेऊन उर्वरित तीन कसोटीसाठी संघ जाहीर करणार आहेत. विराट कोहलीने निर्णय घ्यावा की त्याने भारतीय संघात कधी कमबॅक करावे. त्याने अद्याप तरी आम्हाला काही कळवलेले नाही, परंतु तो जेव्हा खेळण्याचा निर्णय घेईल तेव्हा त्याला थेट भारतीय संघा प्रवेश मिळेल.
तिसऱ्या कसोटीपूर्वी महत्त्वाचे अपडेट्स- विराट कोहलीने अद्याप त्याच्या उपलब्धतेबाबत कळवलेले नाही- तो जेव्हा निवड समितीला कळवेल, तेव्हा त्याचा संघात समावेश केला जाईल- लोकेश राहुल तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज, दुखापतीमुळे त्याने दुसऱ्या कसोटीतून घेतलेली माघार- रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांच्या खेळण्याबाबत चर्चा सुरू