Join us

विराटची १८३ धावांची खेळी विशेष - गंभीर

विराटने तिन्ही प्रकारात अनेकदा शानदार खेळी केली आहे. तरीही माझ्या मते विराटच्या १८३ धावा अप्रतिम होत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 04:39 IST

Open in App

मुंबई : पाकिस्तानविरुद्ध २०१२ च्या आशिया चषक स्पर्धेत विराट कोहलीची १८३ धावांची खेळी तिन्ही प्रकारात सर्वोत्कृष्ट असल्याचे मत माजी सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे. ढाका येथे विजयासाठी ३३० धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने कोहलीच्या १४८ चेडूतील २२ चौकार आणि एका षटकारासह केलेल्या १८३ धावांच्या बळावर सहा गडी राखून विजय साजरा केला होता.

त्या सामन्यात शून्यावर बाद झालेला गंभीर म्हणाला, ‘विराटने तिन्ही प्रकारात अनेकदा शानदार खेळी केली आहे. तरीही माझ्या मते विराटच्या १८३ धावा अप्रतिम होत्या. आम्ही ३३० धावांचा पाठलाग करताना शून्यावर पहिला गडी गमावला होता. त्यावेळी तो तितका अनुभवी नव्हता. तरीही ३३० धावांत त्याचे १८३ धावांचे योगदान विशेष ठरले.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ