Join us  

कोहली हवं तेच करतो, आपण फक्त पाहत राहायचं, बेदी बरसले

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या 'देश सोडून जा' या उत्तरामुळे जास्तच चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 9:28 AM

Open in App
ठळक मुद्दे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या 'देश सोडून जा' या उत्तरामुळे जास्तच चर्चेत आहे.कोहलीच्या हट्टीवृत्तीमुळे अनिल कुंबळेला पदत्याग करावा लागलाबिशन सिंग बेदीची खरमरीत टीका

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या 'देश सोडून जा' या उत्तरामुळे जास्तच चर्चेत आहे. त्याच्या डोक्यात प्रसिद्धीची हवा गेल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे. त्याचे हे विधान अहंकारातून आल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार बिशन सिंग बेदी यांनाही कोहली हट्टी, अहंकारी असल्याचे वाटते. त्याच्या याचा वृत्तीमुळे अनिल कुंबळेला प्रशिक्षकपदावरून पायउतार व्हावे लागले, असा दावा बेदींनी केला आहे.

''विराट कोहली त्याला हवं तेच करतो आणि आपण फक्त त्याला सहमती देत राहायची. अनिल कुंबळेच्या बाबतीतही तसंच झालं. त्याला पद त्याग करण्यास भाग पाडलं,'' अशी टीका बेदी यांनी केली. मात्र, बेदीने मैदानावरील कोहलीच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक केले. ते म्हणाले,''कोहलीसारखा लढाऊ वृत्तीचा खेळाडू संघात नाही, परंतु त्याची तीव्रता आणि संघाची तीव्रता यात बराच फरक आहे. ''

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला 21 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ तीन ट्वेंटी-20, चार कसोटी आणि तीन वन डे सामने खेळणार आहे. स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत पराभूत करण्याची आयती संधी भारतीय संघाला मिळाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मात्र, बेदींना तसे वाटत नाही. ''भारतीय संघात अव्वल खेळाडू आहेत. मात्र, हाच संघ जेव्हा इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत गेला तेव्हा काय झालं हे आपण पाहिले. मजबूत वाटणारा हा संघ परदेशात कमकुवत दिसला. स्मिथ आणि वॉर्नर ही दोघं म्हणजे ऑस्ट्रेलियाचा संघ नाही." 

टॅग्स :विराट कोहलीबीसीसीआय