चेन्नईमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात भारताची स्थिती आणखी मजबूत झाली आहे. टीम इंडिया आता विजयापासून केवळ 6 विकेट दूर आहे. भारताने पाहुण्या संघाला 515 धावांचे लक्ष्य दिले आहे. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशची धावसंख्या 158/4 आहे. भारत अजूनही 357 धावांनी पुढे आहे. पहिल्या दिवशी रविचंद्रन अश्विनने शानदार शतक झळकावले, दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने चार शानदार विकेट घेतल्या आणि तिसऱ्या दिवशी शुभमन गिल आणि ऋषभ पंतनेही जबरदस्त शतके झळकावली.
बांगलादेश 149 धावांवर तंबूत - टीम इंडियाचा पहिल्या डावात 376 धावांवर संपुष्टात आला होता. मात्र, गोलंदाजांनी शानदार पुनरागमन करत बांगलादेशचा डाव अवघ्या 149 धावांत गुंडाळला. बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांनी बांगलादेशला संघर्षाचीही संधी दिली नाही. बांगलादेशकडून अष्टपैलू शाकिब अल हसनने सर्वाधिक 33 धावा केल्या होत्या.
बांगलादेशच्या डावाच्या 31व्या षटकात रवींद्र जडेजाच्या चेंडूवर शाकिबने रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटच्या कडेला लागून वर उडाला आणि यष्टिरक्षक ऋषभ पंतने कसलीही चूक न करता अप्रतिम झेल घेतला. शाकिब आऊट आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अंपायरने रिव्ह्यू घेतला. मोठ्या पडद्यावर हा निर्णय भारताच्या बाजूने आला आणि संपूर्ण संघाने आनंद व्यक्त केला.
कोहलीचा डान्स - भारताच्या बाजूने निर्णय आल्यानतंर, विराट कोहलीनेही आनंद साजरा करत काही क्षणांचा धमाल डान्स केला. त्याचा हा डान्स जबरदस्त व्हायरल होत आहे.
महत्वाचे म्हणजे, कोहलीने मैदानावर डान्स करण्याची ही पहिलीच वेळ नाही.