Join us  

विराटची निवृत्तीची घोषणा झाकोळली जाऊ नये; रोहितने मैदानावर निवृत्ती का टाळली?

Rohit Sharma News: स्टेडिअम खचाखच भरलेले होते. ट्रॉफी जिंकल्याचा विजयाचा जल्लोष सुरु होता. यातच विराटने निवृत्ती जाहीर केली. भारतीय चाहत्यांना हा धक्काच होता. रोहितही या क्षणाचा फायदा घेऊ शकला असता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 3:14 PM

Open in App

भारताने यापूर्वी वर्ल्डकप जिंकले नाहीत असे नाही. परंतू काल सगळेच खेळाडू खूप रडले. कालचा वर्ल्डकप सगळ्यांसाठीच खास होता. रोहित शर्मा , विराट कोहलीला माहिती होते की हा टी २० वर्ल्डकप त्यांच्यासाठी शेवटचा असणार आहे. पुरस्कार देताना विराटला बोलविण्यात आले. यावेळी विराटने हा आपला शेवटचा टी २० वर्ल्डकप आणि शेवटची आंतरराष्ट्रीय टी २० मॅच असल्याची घोषणा केली. युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे विराट म्हणाला. खरेतर रोहितही तेव्हाच त्याची निवृत्ती घोषित करू शकला असता. पण त्याने सगळा कार्यक्रम आटोपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. 

स्टेडिअम खचाखच भरलेले होते. ट्रॉफी जिंकल्याचा विजयाचा जल्लोष सुरु होता. यातच विराटने निवृत्ती जाहीर केली. भारतीय चाहत्यांना हा धक्काच होता. रोहितही या क्षणाचा फायदा घेऊ शकला असता. त्यानेही या विजयी वातावरणात निवृत्ती जाहीर केली असती. परंतू, विराटसाठी तो थांबला. 

विराटच्या निवृत्तीची घोषणा झाकोळली जाऊ नये म्हणून रोहितने मैदानावरच आपली निवृत्तीची घोषणा करणे टाळले. विराटसाठीही हा वर्ल्डकप महत्वाचा होता. परंतू त्याने आपल्यापेक्षा रोहित जास्त सिनिअर असल्याचे कबूल करत त्याचा यावर जास्त हक्क असल्याचे म्हटले. 

दोघांच्याही डोळ्यात पाणी होते. दोघेही आजच निवृत्ती जाहीर करणार होते. परंतू, रोहितने विराटसाठी ती वेळ टाळली. ही वेळ खरोखरच चांगली असल्याचे रोहित म्हणाला. विश्वकप जिंकून निवृत्ती जाहीर करणे हेच योग्य असल्याचे रोहित म्हणाला. रोहितने त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात टी २० ने केलेली. २००७ मध्ये धोनीच्या नेतृत्वात टी २० वर्ल्डकप भारताने जिंकला त्या संघात रोहित होता. आता रोहितच्या नेतृत्वात भारताने वर्ल्डकप जिंकला. आयुष्याचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याचे रोहित म्हणाला. 

टॅग्स :रोहित शर्माविराट कोहलीट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024