वेस्ट इंडिज वर्ल्ड कपमधून बाहेर होताच सेहवागने लाज काढली; तर गंभीरनं दिला 'धीर'

west indies vs scotland : दोन वेळचा जगज्जेता वेस्ट इंडिजचा संघ भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकातून बाहेर झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 01:42 PM2023-07-02T13:42:01+5:302023-07-02T13:42:38+5:30

whatsapp join usJoin us
 Virender Sehwag and Gautam Gambhir react to West Indies' defeat by Scotland in the ICC Cricket World Cup Qualifiers as the Caribbean team is out of the ODI World Cup 2023 in India  | वेस्ट इंडिज वर्ल्ड कपमधून बाहेर होताच सेहवागने लाज काढली; तर गंभीरनं दिला 'धीर'

वेस्ट इंडिज वर्ल्ड कपमधून बाहेर होताच सेहवागने लाज काढली; तर गंभीरनं दिला 'धीर'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : दोन वेळचा जगज्जेता वेस्ट इंडिजचा संघ भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकातून बाहेर झाला आहे. शाई होपच्या नेतृत्वातील विडिंजच्या संघाला स्कॉटलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह कॅरेबियन संघाचे विश्वचषक खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. सध्या झिम्बाब्वेमध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी (ICC Cricket World Cup Qualifiers) पात्रता फेरीचे सामने खेळवले जात आहेत. वन डे विश्वचषकात वेस्ट इंडिजचा संघ नसण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. स्कॉटलंडने विंडीजचा ७ गडी राखून पराभव करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. कॅरेबियन संघ २०२३ च्या विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर वीरेंद्र सेहवागने विंडीज बोर्डावर निशाणा साधला. तर गौतम गंभीरने कॅरेबियन खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे.

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. वेस्ट इंडिजचा संघ विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही. केवळ प्रतिभा पुरेशी नसून राजकारणापासून मुक्त होऊन चांगल्या व्यवस्थापनावर भर देण्याची गरज असल्याचे यावरून दिसून येते." 

स्कॉटलंडविरूद्धच्या पराभवासह कॅरेबियन संघाने आपल्या नावे एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद केली. खरं तर स्पर्धेच्या ४८ वर्षांच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे की, १९७५ आणि १९७९ चे चॅम्पियन वेस्ट इंडिज मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील पहिल्या १० संघांमध्ये स्थान मिळवू शकणार नाही. स्कॉटलंडविरुद्ध शनिवारी वेस्ट इंडिजची फलंदाजी पूर्णपणे अयशस्वी ठरली. संपूर्ण संघ ४३.५ षटकात केवळ १८१ धावांवर बाद झाला. स्कॉटलंडने ६.३ षटके बाकी असताना ३ गडी गमावून लक्ष्य गाठले. लक्षणीय बाब म्हणडे वन डे विश्वचषकात प्रथमच वेस्ट इंडिजचा संघ नसणार आहे.  

गंभीरने दिले प्रोत्साहन
भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना धीर देण्याचा प्रयत्न केला. कॅरेबियन खेळाडूंना प्रोत्साहन देताना गंभीरने म्हटले, "मला वेस्ट इंडिजचा संघ आवडतो, मला वेस्ट इंडिज क्रिकेट आवडते, मला विश्वास आहे की ते अजूनही जागतिक क्रिकेटमध्ये नंबर १ वर येऊ शकतात."

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title:  Virender Sehwag and Gautam Gambhir react to West Indies' defeat by Scotland in the ICC Cricket World Cup Qualifiers as the Caribbean team is out of the ODI World Cup 2023 in India 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.