IPL 2023 : "तुम्ही स्वत:साठी खेळाल तर क्रिकेट तुम्हाला 'थप्पड' मारेलच", वीरेंद्र सेहवाग संतापला

GT Vs PBKS : आयपीएलच्या १६व्या हंगामातील अठरावा सामना पंजाब किंग्ज आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स यांच्यात झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 05:59 PM2023-04-14T17:59:47+5:302023-04-14T18:01:01+5:30

whatsapp join usJoin us
Virender Sehwag criticizes Gujarat Titans player Shubman Gill for slow batting in ipl 2023 match against Punjab Kings | IPL 2023 : "तुम्ही स्वत:साठी खेळाल तर क्रिकेट तुम्हाला 'थप्पड' मारेलच", वीरेंद्र सेहवाग संतापला

IPL 2023 : "तुम्ही स्वत:साठी खेळाल तर क्रिकेट तुम्हाला 'थप्पड' मारेलच", वीरेंद्र सेहवाग संतापला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

hardik pandya fine । मोहाली : आयपीएलच्या १६व्या (IPL 2023) हंगामातील अठरावा सामना पंजाब किंग्ज आणि गतविजेत्या गुजरात टायटन्स (GT vs PBKS) यांच्यात झाला. अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गुजरातने ६ गडी आणि १ चेंडू राखून विजय मिळवला. मात्र, या विजयानंतर हार्दिक पांड्यासह त्याच्या संघाच्या खेळीवर क्रिकेट एक्सपर्ट नाराज असल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात गुजरातचा संघ १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत होता आणि सलामीवीर शुबमन गिल खूपच धिम्या गतीने फलंदाजी करत होता. धिम्या फलंदाजीमुळेच सामना अखेरच्या षटकापर्यंत पोहचला. यावरूनच आता भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने गुजरातच्या संघावर टीकास्त्र सोडले आहे.

संघाला अडचणीत आणून गिल बाद झाला - सेहवाग
शुबमन गिलने केलेल्या धिम्या खेळीवरून वीरूने त्याला चांगलेच सुनावले. शुबमन गिलच्या धिम्या खेळीचा दाखला देत सेहवागने म्हटले, "जर शुबमन गिल त्याच्या अर्धशतकासाठी खेळला नसता तर सामना लवकर संपला असता. त्याने पॉवरप्लेमध्ये ९ चेंडूत १७ धावा केल्या होत्या. मधल्या काही षटकांमध्ये देखील तो चांगला खेळत होता आणि २२ चेंडूत ३५ धावा केल्या होत्या. मात्र, इथपासून अर्धशतक पूर्ण होईपर्यंत त्याने १८ चेंडू खेळले. गिलच्या या खेळीमुळेच सामना अखेरच्या षटकापर्यंत पोहचला." 

"शुबमन गिलने ४९ चेंडूत ६७ धावा केल्या. पण त्याने वैयक्तिक अर्धशतक केव्हा पूर्ण केले? ४१ किंवा ४२ चेंडूत त्याने अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक झाल्यानंतर तो वेगाने खेळू लागला. जर असे झाले नसते तर गुजरातचा संघ शेवटच्या षटकात नव्हे तर १७ किंवा अठराव्या षटकातच विजयी झाला असता. कोणत्याही फलंदाजाने वैयक्तिक खेळीचा विचार न करता संघासाठी खेळायला हवे", असे सेहवागने अधिक सांगितले.

मोहालीत काल झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ८ गडी गमावून १५३ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सच्या संघाने १९.५ षटकांत ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. खरं तर कमी धावसंख्या असतानाही पंजाबच्या गोलंदाजांनी कमाल करून सामन्यात रंगत आणली. पण राहुल तेवतिया पुन्हा एकदा महत्त्वाच्या क्षणी गोलंदाजासाठी काळ ठरला. तेवतियाने २ चेंडूत केलेल्या ५ धावांनी गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 


 

Web Title: Virender Sehwag criticizes Gujarat Titans player Shubman Gill for slow batting in ipl 2023 match against Punjab Kings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.