हार्दिकला T20 WC संघातून वीरेंद्र सेहवागनेही वगळले; अनपेक्षित खेळाडूला १५ जणांमध्ये निवडले

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या कामगिरीवर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 03:18 PM2024-04-24T15:18:39+5:302024-04-24T15:19:06+5:30

whatsapp join usJoin us
Virender Sehwag excludes ace all-rounder Hardik Pandya, Sandeep Sharma gets surprise inclusion in India T20 World Cup Squad | हार्दिकला T20 WC संघातून वीरेंद्र सेहवागनेही वगळले; अनपेक्षित खेळाडूला १५ जणांमध्ये निवडले

हार्दिकला T20 WC संघातून वीरेंद्र सेहवागनेही वगळले; अनपेक्षित खेळाडूला १५ जणांमध्ये निवडले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India T20 World Cup Squad - इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या कामगिरीवर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. हार्दिक पांड्याच्या कामगिरीवर जरा सर्वांचे जास्त लक्ष आहे, कारण वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत दुखापतग्रस्त झाल्यानंतर तो थेट आयपीएलमधून मैदानावर परतला. पण, मुंबई इंडियन्सच्या या कर्णधाराला चांगली कामगिरी करता आलेली नाही, तेच त्याचा स्पर्धक असलेला शिवम दुबे चौकार-षटकारांची आतषबाजी करून निवड समितीचे लक्ष वेधत आहे. त्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हार्दिकची निवड होतेय का, याची उत्सुकता आहे.


भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag ) यानेही त्याच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघातून हार्दिकला वगळले आहे.  १५ सदस्यीय संघात हार्दिकला तेव्हाच मिळेल, जेव्हा तो रिंकू सिंग किंवा शिवम दुबे यांच्यापेक्षा तो चांगली कामगिरी करेल, असे वीरूचे म्हणणे आहे. वीरूने त्याच्या संघात एक अनपेक्षित खेळाडूला संधी मिळाली आहे. वीरूने त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हार्दिकला जागा दिलेली नाही, तर राजस्थान रॉयल्सच्या संदीप शर्माची निवड केली आहे. 


वीरूने सलामीची जोडी म्हणून रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांची निवड केली आहे. विराट कोहली तिसऱ्या आणि सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर आहे.  

मधल्या फळीत  रिषभ पंतचे पुनरागमन झाले आहे, तर फिनिशरची भूमिका रिंकू सिंग किंवा शिवम दुबे यांच्या खांद्यावर सोपवली आहे. रविंद्र जडेजा सातव्या क्रमांकावर खेळेल. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराद आणि संदीप या जलदगती गोलंदाजांसोबत कुलदीप यादव हा फिरकीपटू वीरूच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आहे. 

वीरेंद्र सेहवागची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी प्लेइंग इलेव्हन ( Virender Sehwag’s T20 World Cup XI for India) - रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, रिंकू सिंग/शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, संदीप शर्मा 

Web Title: Virender Sehwag excludes ace all-rounder Hardik Pandya, Sandeep Sharma gets surprise inclusion in India T20 World Cup Squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.