मुंबई : वीरेंद्र सेगवाग. भारताचा माजी तडफदार फलंदाज. क्रिकेटचा प्रकार कोणताही असो, सेहवागने आपली जादू दाखवली आहे. आजच्या दिवशी, पण नऊ वर्षांपूर्वी सेहवागकडे भारताचा पहिला त्रिशतवीर होण्याची संधी होती. पण सेहवागला हा मान का मिळाला नाही. हे तुम्हाला माहिती आहे का...
भारताचा श्रीलंकेविरुद्ध मुंबईत कसोटी सामना खेळवण्यात आला होता. दिवस होता 4 डिसेंबर आणि साल 2009. सेहवागने श्रीलंकेच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेत होता. सेहवाग आता एकाच दिवसात त्रिशतक झळकावेल, असे वाटत होते. पण दिवस संपत येत असताना त्याने एका खेळाडूच्या सांगण्यावरून संथ खेळ केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी सेहवाग मैदानात उतरला खरा, पण त्याला त्रिशतक काही पूर्ण करता आले नाही. श्रीलंकेचा माजी महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने सेहवागला बाद केले. सेहवागने 254 चेंडूंच 293 धावांची खेळी साकारली होती. जर सेहवागने अजून सात धावा केल्या असत्या तर तो भारताचा पहिला त्रिशतकवीर होऊ शकला असता.