भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग त्याच्या बिनधास्त फटकेबाजीनं ओळखला जातो. समोर कोणताही गोलंदाज असो आला चेंडू अन् धाडला सीमापार.... सेहवागचा हाच पवित्रा प्रत्येक सामन्यात पाहायला मिळाला. बचावात्मक फलंदाजी काय, हे सेहवागला माहीतच नाही. त्याच्या या आक्रमक खेळीमागे रामायणातील एक योद्धा आहे आणि सेहवागनं हे रहस्य उलगडलं.
सेहवागनं रविवारी एक पोस्ट ट्विट केली. त्यात त्यानं रामायणातील एक प्रसंगाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यात अंगद हा रामदूत बनून लंकेत गेला होता आणि त्याचा पाय कोणी हलवू शकला नव्हता. त्यामुळे पाय एकाच ठिकाणी घट्ट रोवण्याचा प्रसंग आला आणि सेहवागच्या स्टान्सची चर्चा सुरू झाली. सेहवागनं फुटवर्क न करताच फलंदाजी केली आहे. तो फक्त हात आणि नजरेच्या समन्वयानं फटकेबाजी करत आला आहे. अंगदला पाहून सेहवागलाही त्याची बॅटींग आठवली.सेहवागनं लिहीलं की,''रामायणातील योद्धा अंगदकडून मी प्रेरणा घेतली आहे.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
अरे देवा... ती ५२ अन् तो २२ वर्षांचा; सुपरस्टार फुटबॉलपटूची आई प्रेमात!
लॉकडाऊनच्या काळात विकृतीचा कळस; गायीवर बलात्कार केल्याचा फुटबॉलपटूचा दावा
शोएब अख्तरनंतर आणखी एका पाकिस्तानी खेळाडूला पडतंय भारत-पाक मालिकेचे स्वप्न
क्रिकेटला ब्रेक तरीही विराट कोहली टॉप; आयसीसीनं पोस्ट केली मजेशीर आकडेवारी
'अपेक्षा वि. वास्तव'; सानिया मिर्झाकडून पती शोएब मलिकाला लग्नाच्या हटके शुभेच्छा
...तर MS Dhoniची कोणत्या आधारावर टीम इंडियात निवड कराल?; गौतमचा 'गंभीर' सवाल