भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन निवृत्तीच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. बीसीसीआयसह टीम इंडियाचे आजी-माजी खेळाडू क्रिकेटमधील गब्बरला आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. यात भारताचा माजी क्रिकेटर आणि स्फोटक सलामीवीर विरेंद्र सेहवागची पोस्ट अधिक लक्षवेधी ठरतीये.
धवनच्या निवृत्तीनंतर सेहवागची ती पोस्ट ठरतीये लक्षवेधी
शिखर धवन याने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर करत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची सांगितले. जवळपास दोन वर्षांपासून तो टीम इंडियाबाहेरच होता. शिखर धवनची व्हिडिओ पोस्ट रिट्विट करत सेहवागने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.मोजक्या शब्दांत धवनला दिलेल्या शुभेच्छा संदेशात सेहवागचे ११ वर्षांपूर्वीची दु:ख लपले आहे, असे वाटते. त्यामुळेच सोशल मीडियावर सेहवागची पोस्ट चर्चेत आहे.
सेहवागनं X अकाउंटवरुन धवनची पोस्ट रिट्विट केली आहे. यात त्याने लिहिलंय की, मोहाली टेस्टमध्ये मला रिप्लेस केल्यापासून तू कधीच पाठिमागे वळून पाहिले नाहीस. मागील काही वर्षांत तू सर्वोत्तम कामगिरी करुन दाखवली आहेस. तू नेहमीप्रमाणे हसत खेळत राहा. आगामी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! सेहवागनं जो रिप्लेस शब्द वापरला आहे तो काहींना खटकला आहे. वीरू पाजी धवनने तुम्हाला रिप्लेस केले नव्हते तर तुम्हाला ड्रोप करण्यात आले होते, असा टोला सेहवागला मारला आहे.
धवनने टीम इंडियात घेतली होती सेहवागची जागा
शिखर धवन याने २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सुरुवातीच्या काळात तो छाप सोडण्यात अपयशी ठरला. पण २०१३ मध्ये त्याने दमदार कमबॅक केले होते. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत तो मालिकावीर ठरला. २०१३ मध्ये धवनने कसोटी संघात स्थान मिळवले. सेहवागच्या जागी सलामीवीराच्या रुपात त्याला पसंती मिळाली होती. सेहवाग खराब कामगिरी करत असल्यामुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.