Join us  

"तेव्हा मला विराटचा खूपच राग आला होता..."; वीरेंद्र सेहवागने सांगितली आठवण

सेहवागने नुकतीच एका युट्यूब चॅनेलला दिली मुलाखत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 6:18 PM

Open in App

Virender Sehwag on Virat Kohli: भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जात होता. तो समोर येताच गोलंदाजांचे पाय कापायला लागत असत. हा तडाखेबाज फलंदाज कसोटीत त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठीही प्रसिद्ध होता. सेहवाग केवळ फलंदाजीने संघासाठी योगदान देत नव्हता, तर गरज पडेल तेव्हा गोलंदाजीही करत असे. आपल्या ऑफ स्पिनच्या जोरावर त्याने भारताला अनेक वेळा यश मिळवून दिले आहे. आता सेहवागने गोलंदाजीतील एक मैलाचा दगड न मिळवता आल्याबद्दल, विराट कोहलीचा एक किस्सा सांगितला आहे.

सेहवागने भारतासाठी 251 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने 96 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर या खेळाडूने भारताकडून कसोटीत 104 सामने खेळले असून 40 बळी घेतले आहेत. टी-20 मध्ये त्याला एकही विकेट घेता आली नाही.

तेव्हा मला विराटचा खूप राग आलेला...

सेहवाग म्हणाला की, त्याने आपल्या गोलंदाजीने अनेक मोठ्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे पण विराटवर माझा थोडा राग आहे. सेहवागने BeerBiceps नावाच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले, "आपल्या चेंडूने अनेक बड्या फलंदाजांना मी बाद केले. रिकी पाँटिंग, मायकेल हसी, कुमार संगकारा, महेला जयवर्धने, तिलकरत्ने दिलशान आणि ब्रायन लारा यांसारख्या फलंदाजांना मी तंबूचा रस्ता दाखवला. एकदा मी एडम गिलख्रिस्टलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. पण विराट कोहलीची एक चूक मला सांगावीशी वाटते. विराट कोहलीने एकदा एका सामन्यात त्याच्या चेंडूवर मिड-विकेटवर एक अतिशय सोपा झेल सोडला आणि त्यामुळे तेव्हा मला विराटचा खूप राग आला होता, कारण तो एक विक्रम चुकला होता."

कोहलीला इतका मोठा होईल याची अपेक्षाच नव्हती!

"कोहली एवढ्या उंचीवर पोहोचेल अशी अपेक्षा कधीच केली नव्हती. कोहलीच्या प्रतिभेवर कोणालाही शंका नव्हती पण कोहली आज जिथे आहे तिथे पोहोचेल, अशी अपेक्षा त्याने कधीच केली नव्हती. कोहली 70-75 शतके करेल किंवा 25,000 धावा पूर्ण करेल असे मला वाटत नव्हते," अशा शब्दांत वीरेंद्र सेहवागने कोहलीचे कौतुक केले.

टॅग्स :विरेंद्र सेहवागविराट कोहली
Open in App