Virender Sehwag World Record: वीरेंद्र सेहवागची गणना जगातील सर्वात धडाकेबाज सलामीवीरांमध्ये केली जाते. वन डे मध्येच नव्हे तर कसोटी क्रिकेटमध्येही तो तुफानी फलंदाजी करायचा. सेहवागने आपल्या कारकिर्दीत टीम इंडियासाठी अनेक दमदार खेळी केल्या. मुल्तानमध्ये पाकिस्तानविरुद्धची ३०९ धावांची खेळी कोणीही विसरू शकणार नाही. या खेळीमुळेच सेहवागला 'मुलतानचा सुलतान' म्हटले जाऊ लागले. पण सेहवागचा एक विक्रम मात्र असा आज जो तब्बल १२ वर्षांनंतर अबाधित आहे.
वीरेंद्र सेहवागसाठी 8 डिसेंबर हा दिवस खूप खास आहे. 12 वर्षांपूर्वी याच दिवशी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सेहवागने इतिहास रचला होता. सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 219 धावांची खेळी केली. त्यावेळी सेहवाग कर्णधार म्हणून वनडेमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला. 6 वर्षांनंतर भारताच्या रोहित शर्मानेही ही कामगिरी केली. त्याने कर्णधार म्हणून नाबाद 208 धावा केल्या. रोहितने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध हा विक्रम केला होता. मात्र, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आजही वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. 12 वर्षांनंतरही सेहवागचा हा विक्रम अबाधित आहे.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वोच्च धावसंख्या
- 219 वीरेंद्र सेहवाग विरुद्ध वेस्ट इंडिज, इंदूर 2011
- 208* रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, मोहाली 2017
- 189 सनथ जयसूर्या विरुद्ध भारत, शारजाह 2000
- 186* सचिन तेंडुलकर विरुद्ध न्यूझीलंड, हैदराबाद 1999
- 181 सर व्हिव्हियन रिचर्ड्स विरुद्ध श्रीलंका, कराची 1987
- 175* कपिल देव विरुद्ध झिम्बाब्वे, टुनब्रिज वेल्स 1983