Virender Sehwag trolls Pakistan, World Cup 2023 : न्यूझीलंडने गुरुवारी बंगळुरूमध्ये श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर पाकिस्तान एकदिवसीय विश्वचषक 2023 मधून जवळपास बाहेर पडला आहे. यावर भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाला तुफान ट्रोल केले. भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी विश्वचषक खेळायला आलेल्या 'बाबरसेने'ने पहिले दोन सामने जिंकले होते आणि नंतर रोहितच्या संघाने त्यांना वाईट रीतीने पराभूत करून बाजी मारली होती. यानंतर बाबरच्या संघाला अफगाणिस्तानने देखील हरवले, त्यामुळे त्यांची आणखी मानहानी झाली. असे असताना सेहवागने पाकिस्तानला ट्रोल केले.
वीरेंद्र सेहवागने पाकिस्तान क्रिकेट संघाला ट्रोल केले. बाय बाय पाकिस्तानचे पोस्टर पोस्ट करत त्याने लिहिले की, पाकिस्तान जिंदाभाग... पाकिस्तानचा शेवटचा गट सामना शनिवारी कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर इंग्लंडशी होणार आहे. दुसरीकडे, मुख्य सिलेक्टर इंझमाम उल हकचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून, बाबर आझमची कॅप्टन्सीदेखील धोक्यात असल्याचे बोलले जात आहे. याबाबतच सेहवागने पोस्ट केली आहे. गुडबाय, अलविदा, पाकिस्तान. तुमचा प्रवास इथेच संपतोय. आमच्याकडचा पाहुणचार आणि बिर्याणी खाल्लीत. बरे वाटले. आता सुरक्षित मायदेशी परतण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा, असे त्याने लिहिले. सेहवागच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.
न्यूझीलंडने श्रीलंकेवर 160 चेंडू राखून पाच गडी राखून मिळवलेल्या विजयामुळे त्यांचा नेट रन रेट (NRR) +0.743 वर गेला. या विजयाने उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान जवळपास निश्चित झाले. न्यूझीलंडने गुरुवारी बेंगळुरूमध्ये श्रीलंकेवर पाच गडी राखून विजय मिळवून भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियासह विश्वचषक उपांत्य फेरीत आपले स्थान जवळपास निश्चित केले.