Join us  

Virender Sehwag vs Gautam Gambhir : गौतम अदानींच्या संघाचा वीरेंद्र सेहवाग कर्णधार; गौतम गंभीर, हरभजन सिंग यांच्या संघांना देणार टक्कर! 

भारतीय संघाचे माजी ओपनर वीरेंद्र सेहगाव व गौतम गंभीर ( Virender Sehwag and Gautam Gambhir) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक काळ गाजवला. पण,

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2022 5:33 PM

Open in App

भारतीय संघाचे माजी ओपनर वीरेंद्र सेहगाव व गौतम गंभीर ( Virender Sehwag and Gautam Gambhir) यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक काळ गाजवला. पण, आता हे सहकाही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. इंडियन प्रीमिअर लीगनंतर वीरू व गौतम प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. लीजंड्स लीग क्रिकेटमध्ये ( Legends League Cricket ) गुजरात जायंट्स ( Gujarat Giants) संघाचा वीरू कर्णधार असणार आहे, तर इंडियन कॅपिटल्स ( India Capitals) चे नेतृत्व गौतम गंभीरच्या खांद्यावर आहे. १६ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या लीगमध्ये गुजरात जायंट्सचे मालकी हक्क अदानी ग्रुपने खरेदी केले आहेत, तर इंडियन कॅपिटल्स GMR स्पोर्ट्सलाईनने खरेदी केला आहे.

वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यांच्यासह हरभजन सिंग व इरफान पठाण यांच्याकडेही LLC मध्ये अनुक्रमे भिलवारा किंग्स व मनिपाल टायगर्स संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. चार संघांचा समावेश असलेली ही १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. कोलकाता, लखनौ, नवी दिल्ली, कटक व जोधपूर या शहरांमध्ये लीगचे सामने होणार आहेत. ''क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी मी खूप उत्साही आहे. अदानी ग्रुप हे संघाचे मालक आहेत आणि गुजरात जायंट्सकडून पुन्हा एकदा क्रिकेटची नवी इनिंग्ज सुरू करण्यासाठी सज्ज आहे. मी नेहमी बिनधास्त क्रिकेट खेळत आलोय आणि या लीगमध्येही तसाच खेळ पाहायला मिळेल,'' असे गुजरात जायंट्सचा कर्णधार सेहवाग म्हणाला.  

१६ सप्टेंबरला इंडियन महाराजा विरुद्ध वर्ल्ड जायंट्स यांच्यात कोलकाताच्या इडन गार्डनवर सामना होणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने हा सामना खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष  सौरव गांगुली इंडियन महाराजा संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे, तर इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गन वर्ल्ड जायंट्सचा कर्णधार असेल. या लीगसाठी मुथय्या मुरलीधरन, मिसहाब-उल-हक, जाँटी ऱ्होड्स, मिचेल जॉन्सन, ब्रेट लीग, शेन वॉटसन, रॉस टेलर व डेल स्टेन यांच्यासह ५३ माजी खेळाडूंना करारबद्ध केले आहे.   

इंडियन महाराजा - सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, इरफान पठाण, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, श्रीसंत, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक दिंडा, प्रग्यान ओझा, अजय जडेजा, आरपी सिंग, जोगिंदर शर्मा, रितींदर सिंग सोढी ( India Maharajas: Sourav Ganguly (capt), Virender Sehwag, Mohammad Kaif, Yusuf Pathan, S Badrinath, Irfan Pathan, Parthiv Patel (wk), Stuart Binny, Sreesanth, Harbhajan Singh, Naman Ojha (wk), Ashok Dinda, Pragyan Ojha, Ajay Jadeja, RP Singh, Joginder Sharma, Reetinder Singh Sodhi)

वर्ल्ड जायंट्स - इयॉन मॉर्गन, लेंडल सिमन्स, हर्षल गिब्स, जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मॅक्युलम, जाँटी ऱ्हाड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसाकाड्झा, मश्रफे मोर्ताझा, असघर अफघानस मिचेल जॉन्सन, ब्रेट ली, केव्हिन ओब्रायान, दिनेश रामदीन. ( World Giants: Eoin Morgan (capt), Lendl Simmons, Herschelle Gibbs, Jacques Kallis, Sanath Jayasuriya, Matt Prior (wk), Nathan McCullum, Jonty Rhodes, Muthiah Muralidaran, Dale Steyn, Hamilton Masakadza, Mashrafe Mortaza, Asghar Afghan, Mitchell Johnson, Brett Lee, Kevin O'Brien, Denesh Ramdin (wk)) 

टॅग्स :विरेंद्र सेहवागगौतम गंभीरअदानी
Open in App