नवी दिल्ली : भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आपल्या भन्नाट ट्विटसाठी ओळखला जातो. आता तर त्याने एक वेगळेच ट्विट केले आहे. एकेाकाळी क्रांतीवीर सिनेमामध्ये एक डायलॉग होता, तसेच त्याचे हे ट्विट वाटत आहे. क्रांतीवीर सिनेमामधील 'पहिले बात, फिर मुलाखात और जरूरत पडे तो लाथ' हा डायलॉग चांगलाच फेमस झाला होता. तसेच ट्विट करत सेहवागने एक गोष्ट सर्वांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सेगवागने एक ट्विट केले आहे. यामध्ये त्याने आपल्या जीवनाची तीन तत्व असल्याचे सांगितले आहे. यामध्ये त्याने 'आवेदन... निवेदन... नाही तर दे दणादण' असे लिहिले आहे.
पण हे प्रकरण कशाशी संबंधित आहे, हे तुम्हाला समजले नसेल. भाजपाचे मोठे नेते कैलास विजयवर्गीय यांचा मुलगा आकाश याने नगर निगमच्या एका कर्मचाऱ्याला बाजारामध्ये आपल्या पट्ट्याने मारले होते. यानंतर त्यांनी, पहले आवेदन, फिर निवेदन, नहीं तो दे दनादन, असे म्हटले होते. सेहवागनेही हीच गोष्ट आपल्या ट्विटमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.