Great Job Viru; Pulwama हल्ल्यात शहीद जवानांच्या मुलांना मोफत शिक्षण देतोय वीरेंद्र सेहवाग!

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानं शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. Virender Sehwag's Free Education To Children Of Pulwama Martyrs

By स्वदेश घाणेकर | Published: February 14, 2021 01:33 PM2021-02-14T13:33:21+5:302021-02-14T13:34:00+5:30

whatsapp join usJoin us
Virender Sehwag's Free Education To Children Of Pulwama Martyrs Will Make You Proud | Great Job Viru; Pulwama हल्ल्यात शहीद जवानांच्या मुलांना मोफत शिक्षण देतोय वीरेंद्र सेहवाग!

Great Job Viru; Pulwama हल्ल्यात शहीद जवानांच्या मुलांना मोफत शिक्षण देतोय वीरेंद्र सेहवाग!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याला आज दोन वर्ष पूर्ण झाली. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात भारताचे ४० सीआरपीएफ ( Central Reserve Police Force) जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. भारतानंही जशासतसे उत्तर देताना एअरस्ट्राईक करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला. अनेकांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) यानं शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. सेहवागनं त्याच्या हरयाणा येथील झज्जर मधील शाळेत शिकत असलेल्या शहीद जवानांच्या मुलांचे फोटो पोस्ट केले आहेत. वीरूनं १४ फेब्रुवारी २०१९च्या त्या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रंद्धांजली वाहिली आहे.  इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत, आर अश्विननं मोडला कपिल देव, हरभजन सिंग यांचा विक्रम


सेहवाग आंतरराष्ट्रीय स्कूल आणि स्पोर्ट्स अकादमीत पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांचे ऋण व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न.  टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी; दुखापतीमुळे प्रमुख फलंदाज मैदानाबाहेर!

Very privileged to have been able to contribute in a small way in the lives of son of our heroes of #PulwamaAttack who...

Posted by Virender Sehwag on Saturday, February 13, 2021

केव्हा व कसा झाला होता तो भ्याड हल्ला?

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Web Title: Virender Sehwag's Free Education To Children Of Pulwama Martyrs Will Make You Proud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.