नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामधून विस्तवही जात नसल्याचे म्हटले जाते. विश्वचषकात जेव्हा भारताचा उपांत्य फेरीत पराभव झाला तेव्हा कोहली आणि रोहित यांच्यामध्ये वितुष्ट असल्याचे वृत्त आले होते. पण हे भांडण नेमकं कोण घडवतंय, हे तुम्हाला माहिती आहे का...
भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागला बऱ्याच गोष्टी ज्ञात असतात. त्यामधील एक महत्वाची गोष्ट म्हणजे कोहली आणि रोहित यांच्यातील भांडण. रोहित आणि कोहली यांच्यामध्ये भांडण आहे का? हे भांडण नेमकं कोण्यता गोष्टींमुळे आहे? या भांडणाच्या आगीत तेल नेमकं कोण टाकतंय? अशा काही प्रश्नांवर सेहवागने उत्तर दिले आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेत रोहित आणि कोहली मैदानात फलंदाजीसाठी एकत्र आले होते. त्यावेळी या दोघांमध्ये चांगला समन्वय पाहायला मिळाला नाही. त्यावेळी या दोघांमध्ये भांडण झाल्याची शंका चाहत्यांना आली होती.
रोहित आणि कोहली यांच्या भांडणाचे जन्मदाते कोण आहेत, या गोष्टीचा खुलासा सेहवागने केला आहे. याबाबत सेहवाग म्हणाला की, " रोहित आणि कोहलीमध्ये खरेच भांडण असेल असते तर ते मैदामात दिसले असते. पण हे दोघेही मैदानात जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्यांच्यामध्ये चांगलाच संवाद घडतो. या दोघांमधील भांडण असल्याचा बनाव मीडियाने बनवलेला आहे. मीडियामुळे या दोघांमध्ये भांडण आहे, असे लोकांना वाटत आहे."