आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये विषारी वायूची गळती झाल्यानं एकच खळबळ उडाली. या गॅसगळतीत ८ ते १० जणांच्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर ३००हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच ५ हजारांपेक्षा जास्त लोक या गॅसगळतीनं आजारी पडले आहेत. या सर्व प्रकारावर विशाखापट्टणमच्या पश्चिम विभागाच्या एसीपींनी माहिती दिली आहे. विशाखापट्टणम दुर्घटेनत मृत्यू झालेल्यांना महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं श्रद्घांजली वाहिली. विराट कोहली आणि सानिया मिर्झा यांनीही दुःख व्यक्त केले.
भारत हा मॅच फिक्सिंगचा गुप्त अड्डा; पाकिस्तानी क्रिकेटपटू बरळला
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप संघातून MS Dhoni, Shikhar Dhawan बाहेर; भारताच्या माजी खेळाडूनं निवडला संघ
विखाशापट्टणम येथील एका कंपनीतील 5000 टनाच्या दोन टँकमधून ही गॅसगळती झाली आहे. हा कारखाना मार्चमध्ये लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे बंद होता. त्यामुळे टाक्यांमध्ये आपोआप रासायनिक प्रक्रिया झाली असून, उष्णतेनं ताप निर्माण झाला आणि टाक्यांमधून गळतीला सुरुवात झाली. गॅस गळती झाली तेव्हा लोक गाढ झोपेत होते, असं स्थानिक पोलीस प्रशासनाने सांगितलं आहे. एनडीआरएफचे महासंचालक सत्यनारायण प्रधान म्हणाले की, एनडीआरएफ (नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स)च्या वतीने राबविण्यात येणा-या मदत आणि बचावकार्यात 27 लोकांचा सहभाग आहे, जे औद्योगिक गळती रोखण्यातील तज्ज्ञ आहेत. 80 ते 90 टक्के लोकांना या गॅसगळतीतून वाचवण्यात आलं आहे.
सचिन तेंडुलकरनं ट्विट केलं की,''विशाखापट्टणम येथील ती दृश्य हृदयद्रावक आहेत. गॅस गळतीमुळे आजारी पडलेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. मृत्यू पावलेल्यांच्या कुटूंबियांबद्दल संवेदना व्यक्त करतो.''
'टीम इंडियानं ऑस्ट्रेलिया दौरा करण्यापेक्षा पाकिस्तानात जावं अन् कसोटी मालिका खेळावी'
Mohammed Shamiचं नाव का बदनाम करतेस? हसीन जहाँच्या नव्या व्हिडीओवर नेटिझन्स संतापले
रोहित शर्मानं दिली Good News; मोठ्या आनंदात केलं नव्या पाहुण्याचं स्वागत
Sachin Tendulkarसाठी कन्येनं बनवली स्पेशल डिश; 60 सेकंदात फस्त
...जणू काही मूल झाल्याशिवाय स्त्रीच्या जन्माचं सार्थकच होत नाही; Sania Mirza ची '(वु)मन की बात'
Video : ऐ खुदा, तुने तो हमे हैरान कर दिया!; Harbhajan Singhची कविता व्हायरल
खुशखबर: नव्या नियमांसह मे महिन्याच्या अखेरीस सुरू होणार क्रिकेटपटूंचा सराव
Web Title: Vizag Gas Leakage News : Visuals coming out of Vizag are heartbreaking, Say Sachin Tendulkar svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.