Join us  

श्रीलंकेविरोधात होणाऱ्या वनडे सीरिजसाठी व्हीव्हीएस लक्ष्मणने निवडली प्लेइंग इलेवन, 'या' खेळाडूंना डच्चू...

IND vs SL ODI Series: येत्या 13 जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकेत 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 2:50 PM

Open in App
ठळक मुद्देलक्ष्मणच्या प्लेइंग इलेवनमध्ये 20 सदस्यआयपीएल गाजवणाऱ्या खेळाडूंना स्थान नाही

येत्या 13 जुलैपासून भारत आणि श्रीलंकेदरम्यान वनडे सीरिज सुरू होणार आहे. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने श्रीलंकेविरोधात वनडे सीरीजसाठी भारताच्या प्लेइंग इलेवन (VVS Laxman's playing XI for ODI series vs Sri Lanka) ची घोषणा केली आहे. लक्ष्मणने स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात या प्लेइंग इलेवनची घोषणा केली. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळेल. सर्व सामने कोलंबोमध्ये होतील. 

सोमवारी स्टार स्पोट्सच्या कार्यक्रमात लक्ष्मणने म्हटले, 'मी निवडलेल्या प्लेइंग इलेवनमध्ये सलामीला शिखर धवन आण पृथ्वी शॉ असतील. तिसऱ्या आणि चौथ्या नंबरवर सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन आहेत. ऑलराउंडर म्हणून पाचव्या आणि सहाव्या स्थानावर मनीष पांडे आणि हार्दिक पांड्या, तर सातव्या नंबरवर क्रुणाल पांड्या असेल. व्हीव्हीएसने वेगवान गोलंदाज म्हणून भुवनेश्वर कुमार आणि दीपक चाहर, तर स्पिनर म्ह्णून कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलची निवड केली आहे. दरम्यान, लक्ष्मणने आयपीएल गाजवणाऱ्या ऋतुराज गायकवाड, नितिश राणा आणि देवदत्त पडिक्कलसारख्या खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले नाही.

व्हीव्हीएस लक्ष्मणची प्लेइंग इलेवन

1.शिखर धवन (कर्णधार), 2. पृथ्वी शॉ, 3. सूर्यकुमार यादव, 4. संजू सॅमसन (विकेटकीपर), 5. मनीष पांडे, 6. हार्दिक पांड्या, 7. कुणाल पांड्या, 8. भुवनेश्वर कुमार, 9. दीपक चाहर, 10. कुलदीप यादव, 11. युजवेंद्र चहल.

भारतीय संघ  - शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन ( यष्टिरक्षक), संजू सॅमसन ( यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौथम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार ( उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारीयानेट बॉलर्स - इशान पोरेल, संदीप वॉरियर्स, अर्षदीप सिंग, साई किशोर, सिमरजीत सिंग स्पर्धेचे वेळापत्रक

वन डे मालिका - 13, 16 व 18 जुलै, कोलंबो

ट्वेंटी-20 मालिका - 21, 23 व 25 जुलै, कोलंबो

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाभारतश्रीलंका