वर्ल्ड कपआधी राहुल द्रविडला 'ब्रेक'; BCCI निर्णय घेणार, अजित आगरकर विंडीजला दाखल होणार

अजित आगरकर निवड समिती प्रमुखपदी विराजमान झाल्यानंतर त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. अशात एक मोठी बातमी समोर येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 02:33 PM2023-07-17T14:33:12+5:302023-07-17T14:33:38+5:30

whatsapp join usJoin us
VVS Laxman to coach in Ireland, Rahul Dravid & Co get mini-break before World Cup, Ajit Agarkar SET to Travel to West Indies ahead of IND vs WI 2nd Test | वर्ल्ड कपआधी राहुल द्रविडला 'ब्रेक'; BCCI निर्णय घेणार, अजित आगरकर विंडीजला दाखल होणार

वर्ल्ड कपआधी राहुल द्रविडला 'ब्रेक'; BCCI निर्णय घेणार, अजित आगरकर विंडीजला दाखल होणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या बदलाचे वारे वाहू लागले आहेत... वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी जाहीर झालेल्या संघातून त्याची प्रचिती मिळाली आहे. कसोटी संघातही युवा खेळाडूंना संधी दिली जाताना चेतेश्वर पुजारासारख्या अनुभवी खेळाडूला बाकावर बसवले गेले. आता आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि सध्या संघात असलेल्या सीनियर खेळाडूंचे वय लक्षात घेऊन BCCI पुढे वाटचाल करत आहे. अजित आगरकर निवड समिती प्रमुखपदी विराजमान झाल्यानंतर त्याच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. अशात एक मोठी बातमी समोर येत आहे.


मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) ला वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी मिनी ब्रेक देण्याचा विचार सुरू आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळणार आहे. पण, या मालिकेत राहुल द्रविड अँड टीमला विश्रांती दिली जाणार आहे. व्ही व्ही एस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध मैदानावर उतरेल. या मालिकेसाठी सीनियर्स खेळाडूंनाही विश्रांती दिली जाईल.  


आयर्लंड दौऱ्यावर लक्ष्मणसह सितांशू कोटक आणि हृषिकेश कानेटकर ( फलंदाजी प्रशिक्षक), ट्रॉय कुली व साईराज बहुतुले ( गोलंदाजी प्रशिक्षक) हे जाण्याचा अंदाज आहे. वर्ल्ड कपपूर्वी द्रविड आणि त्यांच्या सहाय्यक सदस्यांना हा मिनी ब्रेक दिला जाणार आहे. ३१ ऑगस्टपासून आशिया चषक होणार आहे आणि त्यासाठी राहुल द्रविड अँड टीम व भारताचे सीनियर्स खेळाडू पुन्हा परततील आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका व वर्ल्ड कप स्पर्धा आहे.  याआधी लक्ष्मणने आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघाचे मार्गदर्शन केले होते. शिवाय द्रविडला कोरोना झाल्यामुळे आशिया चषक २०२२ मध्येही लक्ष्मण संघासोबत होता.  

अजित आगरकरचा विंडीज दौरा
विंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध तीन ट्वेंटी-२० सामने खेळणार आहे. याबाबत राहुल व रोहित यांच्याशी चर्चा करण्याकरीता निवड समिती प्रमुख आगरकर विंडीज दौऱ्यावर जाणार आहे.  
 

Web Title: VVS Laxman to coach in Ireland, Rahul Dravid & Co get mini-break before World Cup, Ajit Agarkar SET to Travel to West Indies ahead of IND vs WI 2nd Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.