मुंबई - भारत व पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये आशिया चषक स्पर्धेची अंतिम लढत होणार, या अपेक्षांना बुधवारी सुरुंग लागला. बांगलादेशने पाकिस्तानचा ३७ धावांनी पराभव केल्यानंतर क्रिकेटप्रेमींची निराशा झाली.
या शेजारी राष्ट्रांचे तणावपूर्ण संबंध पाहता भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका होईल, असे तूर्तास तरी शक्य नाही. त्यामुळे भारत-पाकिस्तान यापुढील क्रिकेट महायुद्धासाठी दोन्ही देशांतील चाहत्यांना पुन्हा एकदा नऊ महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आता थेट जून २०१९मध्ये समोरासमोर येतील. इंग्लंडमध्ये होणाऱ्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत १६ जूनला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगेल. तोपर्यंत हे संघ कोणत्याही स्पर्धेत समोरासमोर येण्याची शक्यता नाही.
Web Title: Wait nine months for the Indo-Pak cricket war
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.