नवी दिल्ली - दोन दिवसांपूर्वी आयपीएलच्या लिलावात अनेक लहानमोठ्या खेळाडूंवर बोली लागली. पण या लिलावात असे काही खेळाडू आहेत की हा लिलाव ज्याच्यांसाठी जॅकपॉट ठरला आहे. राजस्थानमधील छोट्या गावातून असलेल्या कुलवंत खेजरोलियालाही अशीच लॉटरी लागली आहे. एका छोट्याश्या गावातून निघून आरसीबीच्या ड्रेसिंग रूमपर्यंत पोहचालयला कुलवंत खेजरोलियाने अतिशय मेहनत घेतली आहे.
कुलवंत आयपीएलमध्ये येण्यापूर्वी गोव्यातील हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. क्रिकेटमध्ये विशेष संधी भेटत नसल्याने मुळचा राजस्थानमधील झुंझुनू जिल्ह्यातील असलेला कुलवंत हा खूप अस्वस्थ राहायचा. तो या काळात आपला खर्च भागवण्यासाठी गोव्यातील एका नामवंत हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. त्याचे वडिल गावी किराणा दुकाण चालवत आहे. सर्वसाधारण कुटुंबातून त्यानं आरसीबीच्या संघात स्थान मिळवलं आहे.
दोन वर्षापूर्वी वेटरची नोकरी सोडून तो दिल्लीत गेला आणि तिथे एल.बी. शास्त्री क्लबमध्ये प्रवेश घेतला. गौतम गंभीर, नितीश राणा, उन्मुक्त चंद यांसारख्या मोठे खेळाडू याच क्लबमध्ये संजय भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले होते. कुलवंतने भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली कठीण परिश्रम आणि मेहनत करत एक चागंला डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून नावारुपास आला आहे.
याबाबत कुलवंत याने सांगितले की, त्याने पहिल्यांदा दिल्ली क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश केल्यानंतर तो एल.बी. शास्त्री क्लबमध्ये गेला. क्लबच्या वसतिगृहातच तो राहत होता. त्याच्याकडे या दरम्यान खेळण्यासाठी शूजही नव्हते. त्याची परिस्थिती पाहून त्याला प्रशिक्षक संजय भारद्वाज यांनी खेळण्यासाठी शूज दिले. कुलवंत म्हणाला की, मी क्लबमध्ये गौतम गंभीरचा सराव करुन घ्यायचो.
मुंबई इंडियन्सने कुलवंत खेजरोलियाची गुणवत्ता पाहून त्याला आपल्या संघात घेतले. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2017 च्या लिलावात त्याच्या गुणवत्तेकडे पाहून त्याला 10 लाखाला खरेदी केले होते. त्याला दाहाव्या मोसमात एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. यावर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला तब्बल 85 लाख रुपयात खरेदी केले आहे.
खेजरोलियाने विजय हजारे करंडक स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. हरभजन सिंह, रोहित शर्मा, कीरोन पोलार्ड आणि लसिथ मलिंगा सारख्या महान खेळाडुंसोबत वेटरची नोकरी करुन लोकांकडून जेवणाची ऑर्डर घेणाऱ्या कुलवंतने ड्रेसिंग रूम शेअर केला आहे. कुलवंत या वेळी भारतीय कर्णधार विराट कोहलीसोबत ड्रेसिंग रूम शेअर करणार आहे. कोहलीने या मोसमात कुलवंतला खेळण्याची संधी दिली तर तो कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
दरम्यान, आयपीएल लिलावाच्या दुसऱ्या दिवशी जयदेव उनाडकट भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे. मनिष पांडे आणि लोकेश राहुल यांना मागे टाकत जयदेन उनाडकट सर्वात जास्त बोली लागलेला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याला राजस्थान रॉयल्स या संघाने तब्बल 11 कोटी 50 लाखांची बोली लावत आपल्या संघात दाखल करुन घेतलेलं आहे. पहिल्या दिवसाप्रमाणे आजच्या दिवशीही संघमालकांनी परदेशी खेळाडूंवर लक्ष केंद्रीत न करता भारतीय खेळाडूंना आपल्या संघात सामवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. संघमालकांच्या या प्रयत्नात अनेक भारतीय खेळाडूंना चांगल्या रकमेच्या बोली लागलेल्या दिसत आहेत. गौथम कृष्णाप्पा हा खेळाडू 6 कोटी 20 लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. याव्यतिरीक्त वॉशिंग्टन सुंदर, मोहीत शर्मा, संदीप शर्मा, मोहम्मद सिराज या खेळाडूंनाही चांगल्या रकमेच्या बोली लागल्या.