भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना चाहत्यांना मोठा धक्का दिला. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 2011मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकून भारतीयांची 28 वर्षांची प्रतीक्षा संपवली होती. श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात नुवान कुलसेकराच्या गोलंदाजीवर धोनीनं मारलेला विजयी षटकार, आजही डोळ्यासमोर ताजा आहे. भारतीय क्रिकेटसाठी धोनीनं दिलेल्या योगदानाचा गौरव करण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशननं ( एमसीए) घेतला आहे. वानखेडेवरील एक सीट कायमस्वरूपी आता धोनीच्या नावानं ओळखली जाणार आहे, तसा प्रस्ताव एमसीएसमोर ठेवण्यात आला आहे.
पुरस्कार ते तिरस्कार; क्रिकेटवीरांना 'अपमानाचा नारळ' द्यायचं BCCI चं धोरण बरं नव्हं!
श्रीलंकेनं ठेवलेल्या 275 धावांचा पाठलाग करताना भारतानं 4 विकेट्सच्या मोबदल्यात विजय मिळवला. वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर लवकर माघारी परतल्यानंतर गौतम गंभीरनं ( 97) खिंड लढवली. त्याला विराट कोहली (35) आणि धोनीनं (91*) दमदार साथ दिली. 49 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर धोनीनं उत्तुंग षटकार खेचून टीम इंडियाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार एमसीए समिती सदस्य अजिंक्य नाईक यांनी एमसीएकडे एक प्रस्ताव पाठवला आहे. धोनीनं मारलेला तो खणखणीत षटकार ज्या सीटवर पडला, त्या सीटला धोनीचं नाव देण्यात यावं, अशी विनंती त्यात करण्यात आली आहे.
''भारतीय क्रिकेटसाठी धोनीनं दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून त्याच्या नावाची कायमस्वरूपी खुर्ची वानखेडेवर करण्याचा प्रस्ताव मांडला आहे,''असे नाईक यांनी सांगितलं.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020: Dream 11मध्ये चिनी कंपनीची गुंतवणूक; BCCI कडून क्रिकेटप्रेमींची फसवणूक?
टाटा सन्स, बायजूला मागे सारून 'ड्रीम 11' झाले IPL 2020 चे स्पॉन्सर, मोजले 222 कोटी
Rajiv Gandhi Khel Ratna award : रोहित शर्मा, विनेश फोगाट यांच्यासह चौघांना मिळणार पुरस्कार
हार्दिक पांड्याने जाहीर केलं मुलाचं नाव; बघा या फोटोत तुम्हाला सापडतंय का?
किरॉन पोलार्डच्या नेतृत्वाखाली संघ मैदानावर उतरणार; थोड्यावेळात ट्वेंटी-20चा थरार सुरू होणार
IPL 2020 : टायटल स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत पोल पोझिशनवर असलेले 'टाटा सन्स'चं नेमकं काय चुकलं?