Join us

धोनी, ब्रावो यांच्याकडून शिकू इच्छितो : वूड

‘भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो यांच्याप्रमाणे विचार करुन पुढील महिन्यापासून सुरु होणा-या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जसाठी सामनावीर बनायचा प्रयत्न करेल,’ असा विश्वास इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याने व्यक्त केला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 23:37 IST

Open in App

चेन्नई : ‘भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि वेस्ट इंडिजचा अष्टपैलू ड्वेन ब्रावो यांच्याप्रमाणे विचार करुन पुढील महिन्यापासून सुरु होणा-या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जसाठी सामनावीर बनायचा प्रयत्न करेल,’ असा विश्वास इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याने व्यक्त केला आहे. चेन्नई सुपरकिंग्जच्या संकेतस्थळावर पोस्ट करताना वूड म्हणाला की, ‘माझ्या मते दबावाच्या परिस्थितीतील सामना आणि दिग्गजांच्या विचारशैलीचे अभ्यास करु शिकता येऊ शकते. कर्णधाराच्या रुपाने धोनीकडून मला मोलाचे मार्गदर्शन मिळेल आणि ब्रावोकडून मी हळूवार चेंडू टाकण्याची कला शिकू इच्छितो.’चेन्न सुपरकिंग्ज संघाचा सदस्य होणे अभिमानास्पद असल्याचे सांगताना वूड म्हणाला की, ‘आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणे खूप गर्वाची बाब आहे.