‘त्या’ पराभवाचा हिशेब करायचाय चुकता! भारत आज बांगलादेशविरुद्ध भिडणार

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक; उपांत्य फेरीसाठी भारत भिडणार बांगलादेशविरुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 07:34 AM2022-01-29T07:34:46+5:302022-01-29T07:37:02+5:30

whatsapp join usJoin us
Want to calculate 'that' defeat? India to face Bangladesh | ‘त्या’ पराभवाचा हिशेब करायचाय चुकता! भारत आज बांगलादेशविरुद्ध भिडणार

‘त्या’ पराभवाचा हिशेब करायचाय चुकता! भारत आज बांगलादेशविरुद्ध भिडणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ओसबोर्न (अँटिग्वा) : कोरोनाने प्रभावित झालेल्या भारताच्या युवा संघात प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन झाले असून भारतीय संघ मजबूत बनला आहे. त्यामुळे १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय संघामध्ये उत्साह संचारला आहे. यासाठी भारतीय संघाला गतविजेत्या बांगलादेशच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. २०२० साली झालेल्या अंतिम सामन्यात भारताचा बांगलादेशविरुद्ध पराभव झाला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारतीयांना मिळाली आहे.

भारतीय संघातील सहा प्रमुख खेळाडू कोरोनाग्रस्त झाले होते. यातील अनेक खेळाडू कोरोनावर मात करून संघात परतले आहेत. आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या साखळी सामन्याआधी कर्णधार यश धूलसह एकूण सहा खेळाडू विलगीकरणात गेले होते. यातील पाच जण आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आले होते आणि युगांडाविरुद्धच्या अंतिम साखळी सामन्यासही मुकले होते. धूलच्या अनुपस्थितीत निशांत सिंधूने भारताचे शानदार नेतृत्व केले होते. कर्णधार धूलसह, उपकर्णधार शेख रशीद, सिद्धार्थ यादव, आराध्य यादव आणि मानव पारिख हे आयर्लंडविरुद्धच्या सामन्याआधी पॉझिटिव्ह आले होते. धूल आणि रशीद भारताचे प्रमुख फलंदाज असून सलामीच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात चांगल्या लयीमध्ये दिसले होते. युगांडाविरुद्ध विजयी शतक ठोकणारा सलामीवीर अंगकृष रघुवंशी आणि अष्टपैलू राज बावा यांचाही आत्मविश्वास उंचावलेला आहे. विकी ओस्तवाल आणि सिंधू या फिरकीपटूंनी स्पर्धेत अनुक्रमे ७ आणि ४ बळी घेत प्रभावी कामगिरी केली आहे. तसेच बांगलादेशच्या फलंदाजांना राजवर्धन हंगरगेकरच्या वेगाचा सामना करणे सोपे जाणार नाही.

लक्षात आहे तो पराभव! 
याआधीच्या २०२० सालच्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या सत्रात अंतिम लढतीत भारताला बांगलादेशविरुद्ध पराभवाचा धक्का बसला होता. तसेच, सामना संपल्यानंतर दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये बाचाबाची आणि हाणामारीही झाली होती. बांगलादेशचा सध्याचा कर्णधार रकिबूल हसन याने त्यावेळी संघाच्या विश्वविजेतेपदामध्ये मोलाचे योगदान दिले होते. काही आठवड्यांपूर्वीच झालेल्या आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशला नमवले होते.

प्रतिस्पर्धी संघ 
n भारत : यश धूल (कर्णधार), हरनूर सिंह, अंगकृष रघुवंशी, शेख रशीद, निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, मानव पारिख, कौशल तांबे, राजवर्धन हंगरगेकर, विक्की ओस्तवाल, गर्व सांगवान, दिनेश बाना, अराध्य यादव, राज बावा, वासू वत्स आणि रवि कुमार.
n बांगलादेश : रकीबूल हसन (कप्तान), अब्दुल्लाह अल मामुन, अरीफुल इस्लाम, मोहम्मद फहीम, महफिजुल इस्लाम, रिपोन मोंडोल, नईमुर रहमान, तंजिम हसन साकिब, प्रांतिक नवरोज नाबिल, ऐच मोलाह, अहिकुर जमन, इफ्ताखेर हुसैन इफ्ती, एसएम मेहरोब, मुसफिक हसन आणि तहजीबुल इस्लाम.

१९ वर्षांखालील विश्वचषक गुणतालिका
संघ     सामने     विजय     पराभव     टाय     गुण     सरासरी
इंग्लंड     ३     ३     ०    ०     ६        ३.००५
बांगलादेश     ३     २     १     ०     ४       ०.२६२
भारत     ३     ३     ०     ०      ६       ३.६३३
द. आफ्रिका     ३     २     १     ०     ४      १.६५३
पाकिस्तान     ३     ३     ०     ०     ६       २.३०२
अफगाणिस्तान     ३     २     १     ०     ४       १.४६७
श्रीलंका     ३     ३     ०     ०     ६        ०.७५३
ऑस्ट्रेलिया      ३     २     १     ०     ४        ०.०८९

Web Title: Want to calculate 'that' defeat? India to face Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.