पाकिस्तानचा माजी गोलंदाज वकार युनूस याला लॉकडाऊनच्या काळात वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. ट्विटर अकाऊंट हॅकरने हॅक केले असून त्यावरून पॉर्न क्लिप व्हायरल केल्याचा आरोप पाकिस्तानी गोलंदाजानं केला. युनूसच्या ट्विटर अकाऊंटवरून पॉर्न क्लिप व्हायरल झाल्यामुळे ट्विटरवर #waqaryounis ट्रेंड सुरू होता. युनूसनं या सर्व क्लिप डिलिट केल्या आहेत आणि आता सोशल मीडियापासून लांब राहण्याचा निर्णय त्यानं घेतला आहे.
टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा अपघात; गाडीची अवस्था पाहून उडेल थरकाप!
या क्लिप डिलिट केल्यानंतर यनूसनं 7 मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्यात त्यानं सर्व प्रकार समजावण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यानं पुन्हा सोशल मीडियावर दिसणार नसल्याचे सांगितले. अकाऊंट हॅक होण्याची ही पहिली वेळ नसल्याचे युनूसनं स्पष्ट केलं. युनूसनं व्हिडीओत म्हटलं की,''सकाळी उठल्यानंतर मला हे समजलं की ट्विटर हँडल हॅक झाला आहे. तुम्हा सर्वांना त्यामुळे झालेल्या मनस्तापाची मी माफी मागतो.''
''हा लाजीरवाणा प्रकार आहे. लोकांशी संवाद साधण्यासाठी मी सोशल मीडिया किंवा ट्विटरचा वापर करायचो. पण, हॅकरनं सर्व विस्कळीत केलं. यापूर्वीही हॅकरनं असं केलं होतं. तीन-चार वेळा माझं अकाऊंट हॅक झाला आहे आणि हे प्रकार थांबतील असे मला वाटत नाही. त्यामुळे मी आजपासून सोशल मीडिया सोडण्याचा निर्णय घेतआहे. माझ्या कुटुंबीयांवर माझे खुप प्रेम आहे. यापुढे मी सोशल मीडियावर दिसणार नाही. मी पुन्हा सर्वांची माफी मागतो,'' असे वकारने सांगितले.
भाजपा खासदार गौतम गंभीरच्या वडिलांच्या गाडीची चोरी
Web Title: Waqar Younis accuses hacker of liking porn clip from his twetter handle svg
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.