दुबई : आयपीएलच्या सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्ज टीकेचा धनी बनत आहे. सलग दोन सामन्यात पराभव, धोनीचे फलंदाजीसाठी उशिरा येणे आणि फलंदाजीत होत असलेली निराशा यामुळे चाहते नाराज आहेत. अनेक माजी खेळाडूंनीही धोनीच्या नेतृत्वशैलीवर टीका केली आहे. गरज असताना धोनी फलंदाजीसाठी उतरत नसल्यामुळे माजी खेळाडू अजय जडेजाने धोनीच्या नेतृत्व क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
दिल्लीविरुद्ध चेन्नईपुढे १७६ धावांचे आव्हान होते. यावेळीही धोनी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. ‘मी पुन्हा तेच म्हणेन, धोनीच्या फलंदाजी क्रमाबद्दल मी समाधानी नाही. ‘पाठीमागे राहून कोणतेही युद्ध जिंकले जात नाही. शिपाई स्वत:च्या जिवावर जिकून देतील तर तुम्ही पाठीमागे राहून रणनीती आखू शकता. पण चेन्नईच्या बाबतीत असे काही दिसत नाही,’ असे मत जडेजाने व्यक्त केले.