Join us  

स्मिथ, वॉर्नर यांना याआधीही मिळाली होती ताकीद, मीडिया वृत्तात खुलासा

आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या चेंडू कुरतडल्याप्रकरणी चांगलेच अडकलेत. दोघांवर क्रिकेट आॅस्ट्रेलियाने एक वर्षांची बंदी घातली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 4:54 AM

Open in App

सिडनी : आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि फलंदाज डेव्हिड वॉर्नर सध्या चेंडू कुरतडल्याप्रकरणी चांगलेच अडकलेत. दोघांवर क्रिकेट आॅस्ट्रेलियाने एक वर्षांची बंदी घातली. पण स्मिथ आणि वॉर्नर हे वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीत दोषी आढळलेल्या स्मिथ आणि वॉर्नरला २०१६ मध्येही सामनाधिकाऱ्याने ताकीद दिली होती. शेफिल्ड शिल्ड दरम्यान ही ताकीद देण्यात आली होती, असे मीडिया वृत्तात सांगितले गेले.दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत कॅमेरुन ब्रॅनक्रॉफ्टने चेंडूशी छेडछाड केली होती. यानंतर स्मिथने हा आमच्या डावपेचाचा भाग असल्याची कबुली दिली होती. स्मिथ आणि वॉर्नर दोषी आढळल्यानंतर त्यांना कर्णधार आणि उपकर्णधारपद गमवावे लागले. दोघांवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली असून काल आलेल्या वृत्तात त्यांना याआधीही ताकीद देण्यात आली होती, हे उघड झाले.आॅस्टेÑलियाच्या एका नामांकीत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार माजी पंच डेरिल हार्पर यांनी क्रिकेट आॅस्ट्रेलियाचे मॅच रेफ्री आणि पंच निवड व्यवस्थापक सायमन टॉफेल यांना ई-मेल पाठवला होता. या ई-मेलमध्ये त्यांनी, नोव्हेंबर २०१६ मध्ये व्हिक्टोरिया विरोधात खेळण्यात आलेल्या सामन्यात स्मिथ आणि वॉर्नर न्यू साऊथ वेल्सचे प्रतिनिधित्व करत होते. त्यावेळी दोघांनाही ‘फेअर प्ले‘साठी ताकीद देण्यात आली होती. हार्पर यांनी ई-मेलमध्ये लिहिले,‘सामन्याच्या पहिल्या दिवशी डेव्हिड वॉर्नर यष्टिरक्षक पीटर नेव्हिलकडे चेंडू देत होता, तेव्हा वारंवार बाऊन्स करीत होता. पंचांनी हीबाब स्टीव्ह स्मिथच्या निदर्शनास आणून दिली,तरीही त्याने काहीचलक्ष दिले नाही. पुढच्या दिवशीमी प्रशिक्षक जॉन्स्टन यांनाक्रिकेट आॅस्ट्रेलियाला त्यांच्या राष्ट्रीय संघाचा कर्णधार चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात अडकायला नको, असे बजावले होते.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :चेंडूशी छेडछाड