नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वार्नर यांच्यावर एका वर्षांची बंदी घेलण्यात आली होती. त्यामुळे भारताच्या दौऱ्याच्यावेळी हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या संघात नसतील, असे बोलले जात होते. पण वॉर्नर आणि स्मिथ यांना मैदानात एकत्र सामना खेळताना पाहिल्यावर मात्र भारतीय खेळाडूंच्या मनात धस्स झाले असेल.
आतापर्यंत भारताला ऑस्ट्रेलियामध्ये एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. गेल्या दोन दौऱ्यांमध्ये तर भारताला विजय मिळवता आलेला नाही. यावेळी स्मिथ आणि वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या संघात नसल्यामुळे भारताला कसोटी मालिका विजयाची सुवर्णसंधी आहे, असे म्हटले जात आहे. पण या दोघांना एकत्र मैदानात पाहून मात्र भारतीय क्रिकेटपटूंच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
स्मिथ आणि वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत एकत्र पाहायला मिळाले. हा सामना रँडविक आणि सदरलँड या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला होता. स्मिथने या सामन्यात 48, तर वॉर्नरने 13 धावा केल्या. जर त्यांची शिक्षा कमी करण्यात आली तर भारतविरुद्ध त्यांची खेळण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.
हा पाहा व्हिडीओ