अॅडिलेड : डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस लाबुशेन यांनी सलग दुसऱ्या लढतीत शतके झळकाविली. यांच्या कामगिरीच्या जोरावर आॅस्ट्रेलियानेपाकिस्तानविरुद्ध फ्लड लाईटमध्ये खेळल्या जात असलेल्या दुसºया क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी शानदार सुरुवात केली.
पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या पहिल्या दिवशी आॅस्ट्रेलियाने आजचा खेळ संपेपर्यंत १ बाद ३०२ धावांची मजल मारली. वॉर्नर १६६ आणि लाबुशेन १२६ धावा काढून खेळपट्टीवर होते. या दोघांनी आतापर्यंत दुसºया विकेटसाठी २९४ धावांची भागीदारी केली. दिवस/रात्र कसोटीत कुठल्याही विकेटसाठी ही सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे.
ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वॉर्नरने १५४, तर लाबुशेनने १८५ धावा केल्या होत्या. आॅस्ट्रेलियाने ही लढत डावाच्या फरकाने जिंकली होती.
पाकिस्तानला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी या लढतीत विजय मिळविणे आवश्यक आहे; पण पहिल्या दिवसाच्या खेळावर पूर्णपणे आॅस्ट्रेलियाने वर्चस्व गाजविले. वेगवान गोलंदाज मोहम्मद अब्बासचे पुनरागमन आणि १९ वर्षीय मोहम्मद मुसाचे पदार्पण करण्याचाही कुठला परिणाम झाला नाही आणि ब्रिस्बेनप्रमाणे पाकिस्तानचे गोलंदाज वॉर्नर व लाबुशेनविरुद्ध संघर्ष करीत असल्याचे दिसून आले.
Web Title: Warner-Labushen's century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.