Join us  

वॉर्नरला हॉटेलमधून बाहेर हाकला... ऑस्‍ट्रेलियाच्या संघातील खेळाडूंनीच पुकारला एल्गार

मद्यपान केल्यावर वॉर्नर संघातील खेळाडूंना शिव्या घालत होता. एकतर चेंडूशी छेडछाड केल्याचे प्रकरण, त्यानंतर झालेली कारवाई, यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पिचलेले होते. त्यानंतर वॉर्नरने केलेल्या तमाश्यावर संघातील क्रिकेटपटू वैतागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 6:14 PM

Open in App
ठळक मुद्देवॉर्नरला संघातील व्हॉट्सअप ग्रुपमधूनही बाहेर काढण्यात आले आहे.

केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड करण्याचे प्रकरण घडले आणि त्यानंतर संघाचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरला आपले पद सोडावे लागले. या कसोटी सामन्यानंतर वॉर्नर आपल्या मित्रांसह एका रुममध्ये पार्टी करत होता. त्यावेळी त्याने संघ सहकाऱ्यांना काही अपशब्दही वापरले. त्यामुळेच त्याच्यावर सध्या संघ सहकारी वैतागले असून त्याला हॉटेलमधून बाहेर काढण्यासाठी एल्गार पुकारला आहे.

चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्‍टीवन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना अनुक्रमे कर्णधार आणि उपकर्णधार या पदावरुन उचलबांगडी केली आहे. आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघाने स्मिथकडून कर्णधारपद काढून घेतले आहे. पण आता त्यांच्यासाठी आयपीएलचे दारही बंद होऊ शकते.

सामन्यानंतर वॉर्नर आपल्या काही मित्रांसह पार्टी करत होता. यावेळी वॉर्नरने मित्रांसह मद्यपान केले, असेही म्हटले जात आहे. मद्यपान केल्यावर वॉर्नर संघातील खेळाडूंना शिव्या घालत होता. एकतर हे प्रकरण, त्यानंतर झालेली कारवाई, यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू पिचलेले होते. त्यानंतर वॉर्नरने केलेल्या तमाश्यावर संघातील क्रिकेटपटू वैतागले. त्यानंतर वॉर्नरला संघातील व्हॉट्सअप ग्रुपमधूनही बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे आता चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाचे काय होणार, याची चिंता क्रिकेट विश्वाला असेल.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरचेंडूशी छेडछाड