वॉर्नर ‘आॅरेंज कॅप’च्या तर रबाडा ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत आघाडीवर

डेव्हिड वॉर्नर व कॅगिसो रबाडा यांचा आयपीएल २०१९ मधील प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. पण सुरुवातीच्या समान्यांत चमकदार कामगिरीच्या जोरावर हे दोघे अनुक्रमे ‘आॅरेंज कॅप’ व ‘पर्पल कॅप’च्या प्रबळ दावेदारांमध्ये कायम आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 04:49 AM2019-05-07T04:49:44+5:302019-05-07T04:50:21+5:30

whatsapp join usJoin us
 Warner's Orange Cap topped Rabada's Purple Cap race | वॉर्नर ‘आॅरेंज कॅप’च्या तर रबाडा ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत आघाडीवर

वॉर्नर ‘आॅरेंज कॅप’च्या तर रबाडा ‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत आघाडीवर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली  -  डेव्हिड वॉर्नर व कॅगिसो रबाडा यांचा आयपीएल २०१९ मधील प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. पण सुरुवातीच्या समान्यांत चमकदार कामगिरीच्या जोरावर हे दोघे अनुक्रमे ‘आॅरेंज कॅप’ व ‘पर्पल कॅप’च्या प्रबळ दावेदारांमध्ये कायम आहेत.

वॉर्नरने सनरायजर्स हैदराबादतर्फे १२ सामन्यांत एक शतक व आठ अर्धशतकांच्या जोरावर ६९२ धावा फटकावल्या. त्यानंतर तो विश्वकप स्पर्धेच्या तयारीसाठी मायदेशी परतला. पण अद्याप आयपीएलमध्ये एका मोसमात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजाला मिळणारी आॅरेंज कॅप या आॅस्ट्रेलियन खेळाडूकडे आहे. वॉर्नरव्यतिरिक्त के. एल. राहुल (५९३) आणि आंद्रे रसेल (५१०) यंदाच्या मोसात आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक धावा फटकावण्यात यशस्वी ठरले आहेत. पण या दोघांचे संघ अनुक्रमे किंग्स इलेव्हन पंजाब व कोलकाता नाईट रायडर्स साखळी फेरीतच गारद झाले. वॉर्नरला आता मुंबई इंडियन्सचा क्विंटन डिकाक व दिल्ली कॅपिटल्सचा शिखर धवन यांच्याकडून आव्हान मिळू शकते. डिकाकने ४९२ धावा केल्या असून, त्याला अद्याप तीन सामने खेळण्याची संधी आहे. त्यात तो २०० पेक्षा अधिक धावा फटकावण्यात यशस्वी ठरला तर तो आॅरेंज कॅपचा मानकरी ठरू शकतो. हीच स्थिती धवनची आहे. त्याच्या नावावर ४८६ धावांची नोंद आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर (४४६) व रिषभ पंत (४०१) प्रत्येक सामन्यात मोठी खेळी करीत आॅरेंज कॅपसाठी दावेदारी सादर करू शकतात.

सर्वाधिक बळी घेणाºया गोलंदाजाला मिळणारी ‘पर्पल कॅप’ सध्या दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज रबाडाकडे आहे. पाठदुखीमुळे त्याला दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने सावधगिरी बाळगताना मायदेशी परत बोलविले आहे.

रबाडाने १२ सामन्यांत २५ बळी घेतले आहेत. त्याला पर्पल कॅपसाठी सर्वात मोठे आव्हान त्याचा मायदेशातील सहकारी इम्रान ताहिरकडून आहे. ताहिरने चेन्नई सुपरकिंग्सचे प्रतिनिधित्व करताना २१ बळी घेतले आहेत.

प्ले-आॅफमध्ये स्थान मिळविणाºया चार संघांपैकी हैदराबादचा खलील अहमद व मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी १७, चेन्नईचा दीपक चाहरने १६ तर हैदराबादचा राशिद खान व मुंबई इंडियन्सचा लसिथ मलिंगा यांनी प्रत्येकी १५ बळी घेतले आहे. चमकदार कामगिरी करीत त्यांना पर्पल कॅप पटकाविण्याची संधी आहे. मात्र या खेळाडूंना मोठी कामगिरी करावी लागेल.

 

Web Title:  Warner's Orange Cap topped Rabada's Purple Cap race

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.