- हर्षा भोगले लिहितात...राजस्थान रॉयल्सच्या संघनिवडीबाबत उत्सुकता होती. विशेषत: अव्वल ६ खेळाडूंच्या निवडीबाबत. या स्पर्धेची आता केवळ सुरुवात आहे. प्रदीर्घ कालावधीच्या या स्पर्धेत अद्याप सर्वोत्तम कामगिरीची प्रतीक्षा आहे. पण, सनरायझर्सविरुद्धच्या लढतीनंतर राजस्थान रॉयल्सची चेंडू बॅटवर येणाऱ्या खेळपट्टीला पसंती राहील. त्यामुळे जयपूरमध्ये त्यांना कशा प्रकारची खेळपट्टी मिळते, याबाबत उत्सुकता आहे.शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली त्यांनी १४०-१५० सामने खेळले आहेत. पण अलीकडच्या कालावधीत मैदानावरील कर्मचाºयांनी त्यांना चेंडूला उसळी मिळणाºया खेळपट्ट्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्सची शक्ती फिरकीऐवजी वेगवान गोलंदाजीमध्ये आहे व त्यांच्या फलंदाजांना फिरकीऐवजी उसळत्या माºयाची गरज आहे. राजस्थान रॉयल्स आपल्या फलंदाजी क्रमाबाबत गांभीर्याने विचार करतील, असे मला वाटते. हैदराबादमध्ये त्यांनी आघाडीचे जे सहा खेळाडू निवडले त्यात ४ आक्रमक फलंदाज होते. कदाचित त्यांनी रहाणे व सॅम्प्सन यांना संधी द्यायला हवी, कारण त्यांचा स्ट्राईक रेट ११८ व १२२ पर्यंत आहे. याव्यतिरिक्त मला सनरायझर्स हैदराबादची कामगिरी बघताना आनंद झाला. वॉर्नरविना त्यांनी शानदार विजय साकारला. स्पर्धेचा हा पहिलाच आठवडा आहे. त्यामुळे स्पर्धा जशी पुढे जाईल, तशी बेंच स्ट्रेंग्थची परीक्षा राहील. (टीसीएम)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- वॉर्नरविना हैदराबादचा शानदार विजय
वॉर्नरविना हैदराबादचा शानदार विजय
राजस्थान रॉयल्सच्या संघनिवडीबाबत उत्सुकता होती. विशेषत: अव्वल ६ खेळाडूंच्या निवडीबाबत. या स्पर्धेची आता केवळ सुरुवात आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 4:48 AM