वॉर्नरचे प्रशिक्षकांसोबत दोन रात्री वास्तव्य...

मागील दोन दिवस कोचिंग स्टाफने वॉर्नरला काैन्सिलिंग केले. नागपूर कसोटीतील अपयशामुळे वॉर्नरला पुढील सामन्यात स्थान मिळणे कठीण दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 05:54 AM2023-02-12T05:54:34+5:302023-02-12T05:55:40+5:30

whatsapp join usJoin us
Warner's two-night stay with coaches...in nagpur india vs australia | वॉर्नरचे प्रशिक्षकांसोबत दोन रात्री वास्तव्य...

वॉर्नरचे प्रशिक्षकांसोबत दोन रात्री वास्तव्य...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मतीन खान 

नागपूर : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसाठी नागपूरचा कसोटी सामना वेदनादायी ठरला.  दोन्ही डावांत तो खराब खेळला. यामुळेच अन्य सहकाऱ्यांनी त्याला एकाकी पाडले होते. दोन्ही डावांत वॉर्नरने एकूण ११ धावा केल्या. माजी कर्णधार रिकी पाॅंटिंगने त्यावर कठोर टीका करीत त्याला बाहेर का करण्यात येऊ नये, असा सवाल केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी संघ हॉटेलमध्ये परतला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाने वॉर्नरला अन्य सहकाऱ्यांपासून एकटे पाडले. 

मागील दोन दिवस कोचिंग स्टाफने वॉर्नरला काैन्सिलिंग केले. नागपूर कसोटीतील अपयशामुळे वॉर्नरला पुढील सामन्यात स्थान मिळणे कठीण दिसत आहे. पुढील तीन सामन्यांसाठी त्याला संघाबाहेरदेखील केले जाऊ शकते. यामुळे त्याची शानदार कसोटी कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Warner's two-night stay with coaches...in nagpur india vs australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.