मोहाली : किंग्स इलेव्हन पंजाब संघाला सलामीवीर फलंदाज लोकेश राहुलने इंडियन प्रीमिअर लीगमधील प्रतिस्पर्धी संघांना इशारा देताना सूर गवसलेल्या ख्रिस गेलपासून बचाव करण्यास सांगितले आहे.
गेलने रविवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध मोसमातील आपली पहिली लढत खेळताना २२ चेंडूंमध्ये आपले दुसरे वेगवान अर्धशतक झळकावले. पंजाबने रविवारी चेन्नई संघाचा चार धावांनी पराभव केला.
सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना राहुल म्हणाला, ‘गेलला गवसलेला सूर आमच्या संघासाठी शुभवार्ता असून, अन्य संघांसाठी ही वाईट बातमी आहे. तो एकट्याच्या बळावर संघाला जिंकून देऊ शकतो, याची आम्हाला सर्वांना कल्पना आहे. तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवतो. रविवारी त्याने तेच केले.’
आयपीएलच्या लिलावामध्ये गेल दोनदा विकला गेला नाही. त्यानंतर किंग्स इलेव्हन पंजाबने त्याला दोन कोटी रुपयांच्या मूळ किमतीमध्ये विकत घेतले. किंग्स इलेव्हन पंजाब संघ यानंतर आपली पुढील लढत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळणार आहे. सुपरकिंग्सचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले, गेल चांगला खेळला. त्याची खेळी सामन्याच्या निकालावर परिणाम करणारी ठरली.
आयपीएलमध्ये सर्वंच संघ चांगले आहे. आम्ही योजनाबद्ध खेळ करू आणि आपल्या शक्तिस्थळांवर लक्ष केंद्रित करू. सनरायझर्स संघावर कुठे वर्चस्व गाजवता येईल, याचा विचार करू.
- के. एल. राहुल
Web Title: Warning to Gayle: Rahul
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.