Join us  

भारतीय संघाकडून सात वर्षात ' हे ' पहिल्यांदा घडलं

भारताकडून इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात एकूण 16 चौकार पाहायला मिळाले. भारताचा सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक सहा चौकार लगावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 5:43 PM

Open in App
ठळक मुद्देभारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2011 साली विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. सचिनने या सामन्यात 11 चौकारांच्या जोरावर 85 धावा केल्या होत्या.

लंडन : भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करावा लागला. जय-पराजय हे होतंच असतात. पण भारताच्या बाबतीत गेल्या सात वर्षांमध्ये जे काही घडलं नाही ते या सामन्यात पाहायला मिळालं.

इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 322 धावा केल्या होत्या. जो रुटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने ही धावसंख्या उभारली होती. पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा संघ 236 धावांमध्ये आटोपला होता. पण या सामन्यात भारताला एकही षटकार मारता आला नाही. हे भारतीय संघाच्या बाबतीत सात वर्षांनी झाले.

भारताकडून इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात एकूण 16 चौकार पाहायला मिळाले. भारताचा सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक सहा चौकार लगावले. पण भारताच्या एकाही फलंदाजाला षटकार लगावता आला नाही. भारताच्या संघाबाबत ही गोष्ट 2011 साली झाली होती. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 2011 साली विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. सचिनने या सामन्यात 11 चौकारांच्या जोरावर 85 धावा केल्या होत्या. हा सामना भारताने 29 धावांनी जिंकला होता. या सामन्यात भारताने 30 चौकार लगावले होते, पण एकही षटकार त्यांना मारता आला नव्हता.

टॅग्स :इंग्लंड विरुद्ध भारतक्रिकेट