- एबी डिव्हिलियर्स लिहितात...यंदाच्या मोसमात गृहमैदानावर खेळताना आमच्या चाहत्यांना आरसीबीचे टी-शर्ट काळे आणि लोअर लाल रंगाचे राहील, याची कल्पना आहे. बाहेरच्या मैदानावर आमचे टी-शर्ट लाल व लोअर काळ्या रंगाचे असते. यंदाच्या मोसमात आरसीबीच्या खेळाडूंचा पोशाख शानदार आहे, पण खेळाडू सामन्यासाठी चुकीचे टी-शर्ट परिधान करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गेल्या लढतीत असेच घडले.आमचा सहकारी क्विंटन डीकॉक गृहमैदानावर किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या लढतीत आमच्या मोसमातील दुसऱ्या लढतीत बाहेरच्या मैदानावर वापरण्याचा टी-शर्ट परिधान करून आला. सुदैवाने कुणीतरी लवकरच हॉटेल रूममधून त्याचा योग्य टी-शर्ट योग्य वेळी घेऊन आला. त्यामुळे आम्हाला योग्य पोशाखासह मैदानात उतरणे शक्य झाले. याचा अर्थ लढतीत कुठलीच बाब सोपी नसते, हे खरे आहे.लढतीबाबत चर्चा करताना उमेश यादवने शानदार गोलंदाजी केली. पंजाब संघाला चांगली सुरुवात मिळाली असताना यादवने एकाच षटकात तीन बळी घेत समीकरणच बदलविले. पंजाब संघाला १५५ धावा करता आल्या. अपेक्षेपेक्षा २० धावा कमी होत्या, पण तरी लक्ष्य गाठणे सोपे नव्हते. चेन्नईचा आमचा १८ वर्षांचा अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने चार षटकांत २२ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. त्यात लोकेश राहुलचा महत्त्वाच्या बळीचा आहे. त्यानंतर सुंदरने दडपणाखाली अखेरच्या षटकामध्ये दोन चौकारही लगावले. सामनावीराच्या पुरस्कारासाठी उमेश यादवची निवड योग्यच होती, पण आरसीबीमध्ये आमच्या संघात एक परंपरा आहे. त्यात सर्वोत्तम कामगिरी करणाºया खेळाडूला पुरस्कारादाखल मॅच बॉल दिला जातो. त्यासाठी त्या खेळाडूने सर्वाधिक धावा करणे किंवा सर्वाधिक बळी घेणे आवश्यक नाही. मोक्याच्या क्षणी सामन्याचे चित्र बदलणारा हा खेळाडू असतो. पंजाबविरुद्ध विजय मिळवल्यानंतर प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी मॅच बॉल वॉशिंग्टन सुंदरला दिला. त्याचे आम्ही सर्वांनी स्वागत केले. हा विशेष क्षण होता. दरम्यान, चिन्नास्वामी स्टेडियममध्ये उपस्थित आमच्या चाहत्यांनाही कुठलातरी पुरस्कार द्यायला हवा होता. आमच्यासाठी ही महत्त्वाची लढत होती आणि स्टेडियम चाहत्यांच्या गर्दीने फुलले होते.संघाच्या विजयात योगदान दिल्यामुळे आनंद मिळतो, पण सामना संपण्याला काही वेळ शिल्लक असताना बाद झाल्यामुळे निराश झालो. कुठल्याही परिस्थितीमध्ये निकाल महत्त्वाचा ठरतो आणि आम्ही विजयाचा मार्ग शोधण्यात यशस्वी ठरलो. आता रविवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध याच कामगिरीची पुनरावृत्ती करीत विजयी लय कायम राखण्यात यशस्वी ठरू, अशी आशा आहे. (टीसीएम)