IND vs SA: दीपक चहरची रिप्लेसमेंट ठरली! दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी या गोलंदाजाची भारतीय संघात निवड

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 03:44 PM2022-10-08T15:44:57+5:302022-10-08T15:45:55+5:30

whatsapp join usJoin us
Washington Sundar has been replaced by deepak chahar in the Indian squad for the ODI series against South Africa | IND vs SA: दीपक चहरची रिप्लेसमेंट ठरली! दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी या गोलंदाजाची भारतीय संघात निवड

IND vs SA: दीपक चहरची रिप्लेसमेंट ठरली! दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी या गोलंदाजाची भारतीय संघात निवड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेचा थरार रंगला आहे. शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघाला मालिकेतील पहिला सामना गमवावा लागला होता. त्यामुळे उद्या होणारा दुसरा सामना गब्बरच्या सेनेसाठी 'करा किंवा मरा' असा असणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे भारतीय संघाचा घातक गोलंदाज दीपक चहर आफ्रिकेविरूद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाला आहे. आफ्रिकेविरूद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० नंतर दीपक चहरच्या पाठीत जडपणा आला होता, त्यामुळेच लखनौमधील पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा हिस्सा नव्हता. 

दरम्यान, दीपक चहरच्या जागी उर्वरित मालिकेसाठी अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीने वॉशिंग्टन सुंदरची निवड केली आहे. खरं तर चहर आता राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडे (NCA) परत जाणार असून तेथील वैद्यकीय पथक त्याच्यावर देखरेख ठेवेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा सामना ९ ऑक्टोबर २०२२ रोजी रांची येथे खेळवला जाईल. तर ११ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे मालिकेतील अखेरचा सामना खेळवला जाईल.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ - 
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटिदार, राहुल त्रिपाठी, ईशान किशन, संजू सॅमसन, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर. 

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक 
पहिला एकदिवसीय सामना - ६ ऑक्टोबर, लखनौ
दुसरा एकदिवसीय सामना - ९ ऑक्टोबर, रांची 
तिसरा एकदिवसीय सामना - ११ ऑक्टोबर, दिल्ली
 


 

Web Title: Washington Sundar has been replaced by deepak chahar in the Indian squad for the ODI series against South Africa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.