आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक साजरा करणारा एकमेव फलंदाज... कसोटी क्रिकेटमध्ये 15921 आणि वन डे क्रिकेटमध्ये 18426 धावा करणारा सचिन तेंडुलकर जगातला महान फलंदाज आहे. पण, पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि जलदगती गोलंदाज वसीम अक्रमने त्याच्या सर्वोत्तम फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकरला शेवटचे स्थान दिले आहे.
अक्रमच्या सर्वोत्तम फलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडिजचा स्टार खेळाडू व्हिव्हियन रिचर्ड्स अव्वल स्थानावर आहे. यू ट्यूब लाईव्हमध्ये अक्रमने सर्वोत्तम पाच खेळाडू निवडले. अक्रम म्हणाला,''फलंदाजीचे तंत्र आणि त्याचा सामन्यावर होणारा परिणाम पाहता रिचर्ड्स यांचे नाव पहिले तोंडावर येते. रिकी पाँटिंगपासून ते मॅथ्यू हेडन यांना मी गोलंदाजी केली आहे, परंतु रिचर्ड्स यांच्यासारखा कोणी नाही.''
अक्रमने दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडच्या माजी कर्णधार मार्टिन क्रो यांना ठेवले आहे. तो म्हणाला,''जेव्हा रिव्हर्स स्विंगबाबत कोणाला माहीत नव्हते, तेव्हा मार्टिन अगदी सहजतेनं त्याचा सामना करायचा. पाकिस्तानात येऊन मार्टिन क्रो यानं आमच्या रिव्हर्स स्विंगचा सामना करताना दमदार शतक झळकावले होते.''
तिसऱ्या क्रमांकावर ब्रायन लारा आहे. ''ब्रायन लारा वेगळ्याच पठडितला फलंदाज होता. त्याला गोलंदाजी करणं खुपच अवघड होते. इंझमाम उल हकला मी चौथ्या स्थानावर ठेवेन. त्याच्याविरोधात मी खुप कमी सामने खेळलो आहोत. महान फलंदाजांमध्ये त्याचा समावेश आहे.''
अक्रमने या यादित सचिन तेंडुलकरचा अखेरच्या स्थानावर ठेवले आहे. त्यामागचं कारणही त्यानं सांगितले. तो म्हणाला,''सचिनला मी दोन कसोटीपेक्षा अधिक सामन्यांत गोलंदाजी केलेली नाही. सचिनविरुद्ध 10 वर्ष मी आणि वकार कसोटी क्रिकेट खेळलेलो नाही. सचिन 1989मध्ये आला होता आणि 1999पर्यंत त्याच्याविरुद्ध मी खेळलो नाही.''
आपला गडी मागे राहिला; विराट कोहलीला 'या' हॉट मॉडल्सनी टाकलं पिछाडीवर!
Viral Video : 7 वर्षांच्या मुलीचा ‘Helicopter shot’ पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ
लॉकडाऊनमध्ये घरबसल्या विराट कोहलीनं कमावले कोट्यवधी; जाणून घ्या कसे!
Web Title: wasim akram choose top 5 batsmen of his career sachin tendulkar in last place
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.