Join us  

ODI Cricket:वन डे क्रिकेट खेळाडूंवर लादलं जातंय, ट्वेंटी-20 क्रिकेट सोपं आहे; पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूची मागणी

इंग्लंडचा स्टार बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने एक मोठं वक्तव्य केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 1:25 PM

Open in App

लंडन : इंग्लंडचा स्टार ऑलराउंडर आणि कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. स्टोक्सने वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी निवृत्ती घेतल्याने क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. त्याने मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. दरम्यान दक्षिण आफ्रिकेने देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिका खेळण्यास नकार दिला. त्यामुळेच एकदिवसीय क्रिकेटच्या भविष्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तानच्या संघाचे माजी कर्णधार आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०० बळी पटकावणारे वसीम अकरम यांनी एकदिवसीय क्रिकेट हटवण्याची अजब मागणी केली आहे. 

एकदिवसीय क्रिकेटला लादलं जात आहेवसीम अकरम यांच्या म्हणण्यानुसार एकदिवसीय क्रिकेट लादलं जात आहे. टी-२० क्रिकेट सोपे असून एकदिवसीय क्रिकेटमुळे खेळाडूंना थकवा देखील येतो असं त्यांनी द टेलीग्राफ वॉन ण्ड टफर्स क्रिकेट क्लब पॉडकास्टशी संवाद साधताना म्हटले. एकप्रकारे अकरम यांनी स्टोक्सच्या राजीनाम्याचे समर्थन केले असून एकदिवसीय क्रिकेटमुळेच खेळाडू जास्त थकत असल्याचं मोठं विधान केलं आहे. 

अकरम यांनी नेमकं काय म्हटल?"टी-२० क्रिकेट खेळणं खूप सोपे आहे, चार तासात खेळ संपतो. जगभरात अनेक टी-२० लीग असून त्यांच्याकडे खूप पैसा आहे. त्यामुळं मला वाटतं की हा एक आधुनिक क्रिकेटचा भाग आहे. टी-२० असो की मग कसोटी क्रिकेट मात्र एकदिवसीय क्रिकेट म्हणजे मरणासारखेच आहे. एका खेळाडूसाठी एकदिवसीय क्रिकेट खेळणं खूप थकण्यासारखे आहे. त्यामुळे खेळाडू टी-२० या लहान फॉरमॅटवर आणि कसोटीच्या मोठ्या फॉरमॅटवर अधिक भर देत आहेत." 

स्टेडियम देखील भरत नाहीत कधीकाळी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी पटकावणारे गोलंदाज वसीम अकरम यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रेक्षकांची कमी असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी बेन स्टोक्सच्या निवृत्तीचे देखील समर्थन केले. "स्टोक्सचा निर्णय दुखावणारा आहे मात्र मी त्याच्याशी सहमत आहे. एक समालोचक म्हणून देखील एकदिवसीय सामना म्हणजे फक्त ताण आहे, खासकरून टी-२० सामन्यानंतर. मी एक खेळाडू म्हणून कल्पना करू शकतो की ५० षटकांचा सामना आणि त्यानंतर प्री-गेम, पोस्ट-गेम हे किती आव्हानात्मक आहे." अस वसीम अकरम यांनी स्पष्ट केलं. 

 

टॅग्स :वसीम अक्रमटी-20 क्रिकेटपाकिस्तानबेन स्टोक्सलंडन
Open in App