Wasim Akram On Pakistan Team : पाकिस्तानला आपल्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर पाकिस्तानचे माजी खेळाडू आपल्या संघावर सडकून टीका करत आहेत. नवख्या अमेरिकेने पराभूत केल्यामुळे शेजाऱ्यांना सुपर ८ मध्ये प्रवेश मिळवणे कठीण झाले आहे. कारण त्यांचा पुढील सामना बलाढ्य भारतासोबत होणार आहे. अमेरिकेने पराभव केल्यामुळे पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने बाबर आझमच्या संघावर बोचरी टीका केली.
पाकिस्तानातील वृत्तवाहिनीवर बोलताना अक्रमने संताप व्यक्त केला. तो म्हणाला की, हार आणि जीत हा खेळाचा एक भाग आहे. पण शेवटच्या चेंडूपर्यंत संघर्ष करणे महत्त्वाचे आहे. पाकिस्तान क्रिकेटसाठी हा सर्वात वाईट दिवस होता. आता पाकिस्तानला सुपर ८ मध्ये स्थान मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल. कारण पुढचा सामना भारत मग आयर्लंड आणि कॅनडा या मजबूत संघांसोबत होणार आहे.
... अन् पाकिस्तानची डोकेदुखी वाढली
पाकिस्तानला कॅनडासारख्या नवख्या संघाचा ११ तारखेला सामना करायचा आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून कॅनडाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यांनी निर्धारित २० षटकांत ७ बाद १३७ धावा केल्या. कॅनडाने दिलेल्या या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडला अपयश आले. ते निर्धारित २० षटकांत ७ बाद केवळ १२५ धावा करू शकले आणि कॅनडाने १२ धावांनी विजय मिळवला. धिम्या गतीने धावा केल्यानंतर कॅनडाच्या गोलंदाजांनी सांघिक कामगगिरी करत विजय साकारला. हा त्यांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकातील पहिलाच विजय आहे. दरम्यान, पाकिस्तान आणि कॅनडा यांच्यात ११ तारखेला सामना होणार आहे. या आधी पाकिस्तानी संघ बलाढ्य भारताविरूद्ध खेळेल. पाकिस्तानला आपल्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेविरूद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे शेजाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली.
पाकिस्तानचा विश्वचषकासाठी संघ -बाबर आझम (कर्णधार), अब्रार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वासीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद आमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शाबाद खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.
पाकिस्तानचे पुढील सामने - ९ जून - पाकिस्तान विरूद्ध भारत, न्यूयॉर्क११ जून - पाकिस्तान विरूद्ध कॅनडा, न्यूयॉर्क१६ जून - पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड, लॉदरहील