पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार वसीम अक्रमला आजही त्याचे चाहते गोलंदाजी करताना पाहण्याची इच्छा ठेवतात. काही दिवसांपूर्वी युएईमध्ये झालेल्या टी-10 टुर्नामेंटमध्ये निवृत्ती स्वीकारलेल्या अनेक माजी खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सुल्तान इलेव्हन आणि तूफान इलेव्हन या दोन संघांदरम्यान झालेल्या या सामन्यात 51 वर्षांच्या वसीम अक्रमनेही सहभाग घेतला होता.
वसीम अक्रम सुल्तान इलेव्हन या संघाचं कर्णधारपद सांभाळत होता. टॉस जिंकल्यानंतर वसीम अक्रमने शोएब मलिकच्या संघाला फलंदाजीच आमंत्रण दिलं. तुफान इलेव्हनने 10 षटकांमध्ये 6 विकेट गमावून 73 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या अक्रमच्या टीमने 9.2 षटकांमध्येच तीन विकेट गमावून विजय मिळवला. गोलंदाजी करताना अक्रमने एक बळी मिळवला. तुफान इलेव्हन संघाचा कर्णधार शोएब मलिकची अक्रमने सुरूवातीच्या षटकांमध्येच विकेट घेतली.
ज्या प्रकारे शोएब मलिक बाद झाला ते पाहणं इंटरेस्टींग होतं. ज्या चेंडूवर अक्रम बाद झाला तो चेंडू अंपायरनी प्रथम वाईड ठरवला, पण अक्रमने अपिल करण्यास सुरूवात करताच अंपायरनी आपला निर्णय बदलला आणि मलिकला बाद ठरवलं. ज्या पद्धतीने अंपायरनी स्वतःचा निर्णय फिरवला ते पाहून सर्व हैराण होते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अंपायरची मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे.
Web Title: wasim akram viral video of taking shoaib malik wicket at age of 51
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.