नवी दिल्ली-
भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानवर चार गडी राखून विजय प्राप्त केला. या सामन्यात विराट कोहलीने नाबाद ८२ धावांची खेळी साकारली. तर हार्दिक पंड्यानंही ४० धावांचं मोलाचं योगदान दिलं. तसंच गोलंदाजीत अर्शदीप सिंग आणि भुवनेश्वर यांनीही जबरदस्त कामगिरी केली. हार्दिकने तर फलंदाजीसह गोलंदाजीतही उल्लेखनीय कामगिरी केली. पंड्यानं १७ चेंडूत ४० धावांची खेळी साकारुन कोहलीसोबत शतकी भागीदारी तर केलीच पण गोलंदाजीत तीन विकेट्सही घेतल्या.
केएल राहुलकडून कोचिंग स्टाफने करुन घेतली प्रचंड मेहनत, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...
मेलबर्नमधील विजयात विराट कोहलीची सर्वत्र चर्चा होत असली, तरी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम आणि वकार युनूस हे हार्दिक पंड्याच्या कामगिरीनं चांगलेच भारावले आहेत. त्यांनी पंड्याचा थेट भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधार म्हणून उल्लेख केला आहे.
David Warner ने भारी कॅच घेतला! श्रीलंकेच्या डावाला दिली कलाटणी
पाकिस्तानच्या एका टीव्ही चॅनलवरील चर्चेदरम्यान माजी कर्णधार मिसबाह-उल-हक याने हार्दिक पंड्याचं तोंडभरुन कौतुक केलं. "जर तुम्ही हार्दिक पंड्याच्या कामगिरीकडे पाहिलं तर त्यानं पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवलं. ज्या पद्धतीनं त्यानं संघाला हाताळलं ते कौतुकास्पद आहे. यावरून तो सामन्यातील दबाव कसा हाताळतो याची कल्पना सर्वांना आली आहे. याशिवाय तो संघात फिनिशरच्या भूमिकेतही दिसला आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत असाल तरच तुम्ही संघात फिनिशर होऊ शकता हे त्यानं सिद्ध केलं आहे", असं मिसबाह-उल-हक म्हणाला. या चर्चेदरम्यान वकार युनूस म्हणाले की, 'हार्दिक टीम इंडियाचा पुढचा कर्णधार झाल्यास मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही'
टीम इंडियाला विजयाच्या शुभेच्छा देऊनही ट्रोल झाले सौरव गांगुली, असं का घडलं? पाहा
यानंतर वसीम अक्रम यांनीही हार्दिकवर कौतुकाचा वर्षाव केला. "पहिल्या आयपीएलमध्ये कर्णधार झाला आणि तिथं तो जिंकलाही. सध्या तो संघाची मोठी ताकद आहे. तो कॅप्टनला सल्ला देतो. तो आपला शब्द शांतपणे पाळतो. यासोबतच तो शिकत आहे", असं वसीम अक्रम म्हणाले.
आयपीएलमध्ये कर्णधारपदासोबतच हार्दिक पंड्याने टीम इंडियाचे नेतृत्वही केले आहे. आयर्लंड दौऱ्यावर झालेल्या दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेत हार्दिक संघाचा कर्णधार होता. त्याचवेळी इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सच्या कर्णधारापदी त्याची नियुक्ती करण्यात आली होती. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने पदार्पणाच्या मोसमात विजेतेपद पटकावण्याची किमया केली. हार्दिक संघातील वरिष्ठ आणि ज्युनियर खेळाडूंमध्ये चांगला समतोल साधतो हेही आयपीएलमध्ये दिसून आलं आहे.