घटस्फोटीत ११ क्रिकेटर्सच्या यादीत नवऱ्याचं नाव; याचा पाक दिग्गजाच्या दुसऱ्या 'बेगम'ला आला राग

.. अन् दिग्गज क्रिकेटरच्या दुसऱ्या बायकोची तळपायाची आग गेली मस्तकाला, नेमकं काय घडलं?

By सुशांत जाधव | Updated: February 25, 2025 18:49 IST2025-02-25T18:23:01+5:302025-02-25T18:49:23+5:30

whatsapp join usJoin us
Wasim Akram Wife Shaniera Slams Social Media User Wrong Information Divorce Cricketers 11 Partners List | घटस्फोटीत ११ क्रिकेटर्सच्या यादीत नवऱ्याचं नाव; याचा पाक दिग्गजाच्या दुसऱ्या 'बेगम'ला आला राग

घटस्फोटीत ११ क्रिकेटर्सच्या यादीत नवऱ्याचं नाव; याचा पाक दिग्गजाच्या दुसऱ्या 'बेगम'ला आला राग

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Wasim Akram Wife Angry On Divorced Cricketers 11 : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर वसीम अक्रम याने मोहम्मद रिझवान याच्या संघाला घरचा आहेर दिलाय. एका बाजूला वसीम आक्रमचा पाकिस्तानी संघावरील राग चर्चेचा विषय ठरत असताना आता त्यात दिग्गज क्रिकेटरच्या बायकोची एन्ट्री झाली आहे. आता ती चर्चेत येण्यामागे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमुळे सुरु असलेल्या गोष्टीचा काहीही संबंध नाही. तर नवऱ्याला मुडक्या संसाराचा टॅग लागल्यामुळे ती संतापली आहे. नेमकं असं काय घडलं? शानीरा थॉम्पसन/अक्रम हिने नेमकं काय म्हटलंय ते आपण इथं सविस्तर जाणून घेऊयात.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

क्रिकेटर्सचा फिल्डबाहेरील प्रेमाचा खेळ, कुणाचं प्रेम बहरलं तर कुणाचा डाव अर्ध्यावरच मोडला

क्रिकेटर्स अन् त्यांचे लव्ह अफेअर्स हा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. जुन्या जमान्यातील क्रिकेटर्स पासून ते सध्याच्या घडीला टॅटूमॅन क्रिकेटपर्यंत अनेकजण मैदानाबाहेरील प्रेमाच्या खेळामुळे चर्चेत असतात. कुणाचं प्रेम डेटिंग सेटिंगपर्यंत मर्यादीत राहिलं तर कुणी प्रेमाच्या पलिकडे जाऊन लग्नही उरकलं. आता लग्न झालं ती जोडी टिकली असं नाही. अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांची पार्टनरसोबत जोडी जमली, पण हिट होत असताना अचानक जोडी फुटल्याची गोष्ट ऐकायला मिळाली. यात देशविदेशातील अनेक क्रिकेटर्सचा समावेश आहे. भारतीय क्रिकेटर्सबद्दल बोलायचं तर शिखर धवन, हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहल या क्रिकेटर्सचा आयुष्यातील पार्टनरसोबत बहरलेली पार्टनरशिप फुटल्याची गोष्ट चर्चेत आहे.

घटस्फोटीत क्रिकेटर्सच्या इलेव्हनमध्ये वसीम अक्रमचं नाव, त्याचा 'बेगम'ला आला राग 

क्रिकेटर्सच्या घटस्फोटाचे वाढते प्रमाण पाहून एका सोशल मीडिया अकाउंटवरुन घटस्फोटीत क्रिकेटर्सची इलेव्हन तयार करण्यात आलीये. यात घटस्फोट झालेल्या ११  क्रिकेटरचा समावेश करण्यात आलाय. या इलेव्हनमध्ये आपल्या नवऱ्याचं नाव पाहिल्यावर त्याची दुसरी बेगम शानीरा थॉम्पसन/अक्रम हिची तळपायाची आग मस्तकाला गेल्याचा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टवर भाष्य करत तिने आपल्या मनातील राग व्यक्त केला आहे.

घटस्फोटीत क्रिकेटर्सच्या इलेव्हनमध्ये कोण कोण?

आउट ऑफ कंटेक्स्ट क्रिकेट नावाच्या एक्स अकाउंटवरुन घटस्फोटित ११ क्रिकेटर्सची यादी शेअर करण्यात आली आहे. यात शिखर धवन, मोहम्मद अझरुद्दीन, विनोद कांबळी, रवी शास्त्री, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अनिल कुंबळे, शेन वॉर्न, जवागल श्रीनाथ, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल आणि वसीम अक्रम या क्रिकेटर्सची नावे देण्यात आली आहेत. यात अक्रमच नाव बघून त्याच्या बेगमचा पारा चढला आहे. 

घटस्फोटीत क्रिकेटर्सच्या यादीत नवऱ्याचं नाव पाहून का चिडली शनीरा?

वसीम अक्रमची पत्नी शानीरा थॉम्पसन/अक्रम ही ऑस्ट्रेलियन आहे. २०१३ मध्ये तिने पाकचा दिग्गजाशी लग्न केले होते. ती समाज कार्यात सक्रीय आहे. ४२ वर्षीय शनीरा वसीम अक्रमची दुसरी बेगम आहे. या जोडीला एक मुलगीही आहे. तिला राग येण्यामागचं कारण हे की, ती वसीम अक्रमची दुसरी पत्नी असली तरी अक्रमनं पहिल्या पत्नीला तलाक दिला नव्हता. वसीम अक्रमच्या पहिल्या पत्नीच नाव  मुफ्ती असं होते. ती देखील शनीरा प्रमाणेच समाज कार्यात सक्रीय असायची. १९९५ मध्ये  वसीम अक्रम आणि मुफ्ती यांचा निकाह झाला होता. २००९ मध्ये आजाराने पहिल्या पत्नीचे निधन झाल्यावर पाकच्या माजी क्रिकेटरनं शानीराशी दुसरा निकाह केला. त्याने पहिल्या पत्नीला तलाक दिला नव्हता. त्यामुळेच अपुऱ्या माहितीसह पोस्ट शेअर केल्याचा दावा करत वसीम अक्रमची पत्नी भडकली आहे. कोणतीही माहिती शेअर करताना त्याचा नीट पाठपुरावा करा. चुकीच्या गोष्टी पसरवून नका आणि तशा गोष्टी फॉरवर्डही करू नका, असे तिने म्हटले आहे.

Web Title: Wasim Akram Wife Shaniera Slams Social Media User Wrong Information Divorce Cricketers 11 Partners List

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.