Join us

Prithvi Shaw : शुबमन गिलची इंग्लंड दौऱ्यातून माघार; पृथ्वी शॉला प्रोत्साहन देताना वासीम जाफरला आठवला अजय देवगन!

इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शुबमन गिल यानं दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 11:22 IST

Open in App

इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शुबमन गिल यानं दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतली आहे. त्याला रिप्लेसमेंट म्हणून विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी निवड समितीकडे पृथ्वी शॉ आणि आणखी एका खेळाडूची मागणी केली आहे. टीम इंडियाचे मॅनेजरनं निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांना त्या आशयाचा ई मेल पाठवला आहे. ( Team India's manager wrote an email to the chairman of selectors Chetan Sharma asking for two replacements in the Indian squad, one as a backup post Shubman Gill's exit and one another batsman). दरम्यान, पृथ्वी शॉ सध्या टीम इंडियाच्या दुसऱ्या फळीसह श्रीलंका दौऱ्यावर आहे आणि त्याला थेट तेथून इंग्लंडसाठी रवाना व्हावे लागणार आहे. याच गोष्टीवरून भारताचा माजी सलामीवीर वासीम जाफर ( Wasim Jaffer) यानं भन्नाट मीम्स पोस्ट केला आहे.

Video : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा; ३८व्या वर्षी जेम्स अँडरसननं १० षटकांत घेतल्या ७ विकेट्स!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अपयशानंतर पृथ्वी शॉसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले होते. त्यामुळे भारतात झालेल्या  इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी त्याचा नावाचा विचार केला गेला नाही. तसेच इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघातही त्याची निवड झाली नाही. पण, ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मायदेशात पृथ्वी विजय हजारे ट्रॉफीत विक्रमी कामगिरी केली. विजय हजारे ट्रॉफीच्या एका पर्वात ८००+ धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. तरीही त्याची निवड झाली नाही. पण, शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियात श्रीलंका दौऱ्यासाठी त्याला संधी मिळाली. आता तर त्याला इंग्लंडमधूनही मागणी येत आहे. त्यामुळे जाफरनं पोस्ट केलेल्या मीम्सनं लक्ष वेधले आहे.अजय देवगनच्या चित्रपटातील फोटो पोस्ट करताना जाफरनं पृथ्वीला शुभेच्छा दिल्या आहेत.  

भारत- इंग्लंड मालिकेतील पहिला सामना नॉटिंघम येथे ४ ते ८ ऑगस्ट या कालावधीत खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना लंडनच्या लॉर्ड्‌स मैदानावर १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीत होईल. तिसऱ्या सामन्याचे आयोजन २५ ते २९ ऑगस्टदरम्यान लीड्‌सवर होईल तर चौथा सामना २ ते ६ सप्टेंबर या कालावधीत लंडनच्याच ओव्हल मैदानावर खेळविला जाईल.  मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना ६ ते १० सप्टेंबरपर्यंत मॅनचेस्टरमध्ये होईल.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडपृथ्वी शॉशुभमन गिलवासिम जाफर